अर्जुनी मोर, दि. 03 ऑक्टबर : आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गुढरी, सोमलपुर, भिवखिडकी या गावांना भेटी देऊन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्राम साधनसामग्रीचा अभाव असल्याचा ठपका ठेवत समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर अनेक समस्यांवर संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी आमदारांना पिण्याचे पाणी, संजय गांधी निराधार, रस्ते, सभामंडप, शाळा दुरुस्ती, रेशनकार्ड, आदी समस्यांची माहिती दिली. लवकरच प्रत्येक समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन आमदारांनी ग्रामस्थांना दिले. ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे हे माझे प्राधान्य असल्याचे आमदार म्हणाले. अर्जुनी मोरगाव मतदारसंघाच्या विकासाला वेग आला आहे. प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, गुढरी चे सरपंच विवेक डोंगरे, सरपंच सोमलपुर भुमिताताई ढोक, उपसरपंच उल्हास लेंडे, नीलकंठ कांबळे सरपंच भिवखिडकी, सुरेश बावणे, रतीराम कापगते, चंद्रमणी बंसोड, ताराचंद फुंडे, विना वासनिक, मीराबाई सोनवाने, सुमित्रा मेश्राम, कौतुका पेटकर, कुणाल वहारे, मनीष फुंडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
.