जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तीन “एस” चा अंगीकार करा : रमेश जोशी


  • लोहिया विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

सौंदड, दी. 03 ऑक्टबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा व लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 02 ऑक्टोबर 2023 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था, जगदीश लोहिया, सौंदड, प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष के. टी. नगर , नागपूर व सामाजिक कार्यकर्ता रमेश जोशी, जि. प. सदस्य गोंदिया निशाताई तोडासे, माजी सरपंच, सौंदड गायत्रीताई इरले , माजी जि. प. सदस्य रूपालीताई टेंभुर्ने, माजी समाजकल्याण सभापती जि. प. गोंदिया राजेश नंदागवळी, प्रल्हाद कोरे, बिरला गणविर वार्ताहर, हरणे सर, भजनदास बडोले, से.नि. प्राचार्य अनिल मेश्राम, कटणकार साहेब, बबलू मारवाडे संपादक रूद्र सागर न्यूज पेपर, प्राचार्य एम.एन. अग्रवाल, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, प्राध्यापक आर.एन. अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथिंनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष यांनी ,”जीवनात येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला सामोरे जाऊन यशाचे शिखर गाठावे”असे मोलाचे मार्गदर्शन केले.

प्रमुख अतिथी रमेश जोशी यांनी ” विद्यार्थ्यांनो जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्किल, स्पीड व स्केल या तीन एस चा अंगीकार करा.” असे मार्गदर्शन केले. तसेच इतर मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन व कार्याची जाणीव करून देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. माननीय अतिथिंनी विद्यार्थांची शिस्त व विद्यार्थांनी पाहुण्यांसमोर सादर केलेल्या आकर्षक अशा चंद्रयान 3 लाॅचिंग वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले.

विद्यार्थांनी गीत व भाषनाद्वारे या दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यगण निमंत्रित पाहुणे, गावकरी, पालक, विद्यालयांचे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कु. यू. बी. डोये यांनी केले तर आभार टी. बी. सातकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता गांधीजींच्या “वैष्णव जन तो ” या भजनाने करण्यात आली.


 

Leave a Comment

और पढ़ें