- लोहिया विद्यालयात संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांचा वाढदिवस साजरा
सौंदड, दि. 30 सप्टेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा व लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांचा वाढदिवस दिनांक – 29 सप्टेंबर 2023 ला साजरा करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने लोहिया शिक्षण संस्था माजी अध्यक्ष सुभाष अग्रवाल, संस्था सदस्य सुरेशकुमार लोहिया, संस्था सदस्य, पंकज लोहिया, परेश लोहिया, प्रेमलता लोहिया, संदिप लोहिया, पारुल लोहिया, स्नेहा लोहिया तसेच लोहिया परिवारातील सदस्यगण तसेच सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी चिंतामण थेर, आर. एफ. ओ. जाधव साहेब, डॉ.बाबुराव कोरे, माजी जि. प. सदस्य मिलन राऊत, जि.प. सदस्य निशाताई तोडासे, माजी जि. प. सदस्य रूपालीताई टेंभुर्ने, सरपंच फुटाळा लताताई गहाने, प्राचार्य एम.एन. अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी.एस. टेंभुर्ण, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल उपस्थित होते.
याप्रसंगी सुभाषचंद्र अग्रवाल, माजी अध्यक्ष लो. शि. संस्था, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी चिंतामण थेर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम, डॉ. कोरे, मिलन राऊत, रुपालीताई टेंभूर्ने , प्राचार्य एम. एन. अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, प्राध्यापक जी. एस कावळे, यु. आर. बाच्छल, कल्पना काळे, टी. बी. सातकर, विद्यालयातील इतर शिक्षक आणि मित्रमंडळींनी जगदीश लोहिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि भावी सुखमय आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा देवून त्यांच्या शिक्षणातून केलेल्या परिसरातील जनसामन्याच्या जीवनात केलेल्या क्रांतीचा आणि लोककल्याणकारी कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला.
तसेच कनव लोहिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित निमंत्रितांनी भेटवस्तू व शुभेच्छा दिल्या यावेळी जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष यांनी वाढदिवसाला उपस्थित सर्व निमंत्रित मंडळी, मित्रपरिवार सदस्य यांनी ‘ जीवन एकदाच लाभते, शिक्षणाच्या माध्यमातून परिसरातील लोकांचे कल्याण करता आले. यातच जीवन सार्थक झाले. माझ्या जीवन शिक्षण व लोककल्याणासाठी समर्पित राहिले” असे मनोगत व्यक्त करून हे शिक्षण कार्य आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत माझ्या हातून घडावे अशी ईच्छा व्यक्त केली.
आयोजक संस्थेतंर्गत विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी वाढदिवसाला उपस्थित सर्वांचे आभार मानले.