गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर; हॉकफोर्ससोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार!


  • गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बालाघाट जिल्ह्यात नक्षल चकमक, चकमकीत 1 नक्षलवादी ठार 
  • १४ लाखांचे होते बक्षीस, मध्यप्रदेशात चकमक; गोंदियात खळबळ ?

गोंदिया, दि. ३० सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्ससोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार करण्यात बालाघाट पोलीसांना यश आले आहे. तसेच मृत्यू झालेल्या नक्षलवर तब्बल १४ लाखांचे बक्षीस होते. ही घटना बालाघाट जिल्ह्यातील रूपझर पोलीस ठाण्यांतर्गत कडला येथील जंगलात, कुंदल-कोद्दापार या ठिकाणी घडली असून बालाघाट पोलीस ठाण्यांतर्ग हे या वर्षातील तिसरे मोठे यश आहे.

मागील काही दिवसा अगोदरच गोंदियात पतीपत्नी नक्षल्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल होत. जरी मध्यप्रदेशात चकमक झाली असली तरी गोंदियात या घटने मुळे खळबळ माजली असून गोंदिया जिल्हा पोलीस अँक्शन मोडवर असल्याचे बोलले जाते.

गेल्या अनेक दशकांपासून नक्षलवादाच्या समस्येशी झगडत असलेल्या बालाघाट जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवादाच्या निर्मूलनात व्यस्त असलेल्या हॉक फोर्सला २९ सप्टेंबर रोजी आणखी एका मोठ्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. २५ वर्षीय मलाजखंड दलम चा नक्षलवादी कमलू हा हॉक फोर्स सोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. कमलू वर १४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

हॉकफोर्स चे जवान जंगलात शोध मोहीम राबवित असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली हे सर्व नक्षलवादी मलाजखंड दलम चे सक्रिय सदस्य होते. या चकमकीत नक्षलवाद्यांनी जवानांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हॉकफोर्सने केलेल्या गोळीबारात नक्षलवादी कमलू ठार झाला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास बालाघाट जिल्ह्यातील रूपझर पोलीस ठाण्यांतर्गत कडला येथील जंगलात, कुंदल-कोद्दापार या ठिकाणी घडली. बालाघाट पोलीस ठाण्यांतर्ग हे या वर्षातील तिसरे मोठे यश आहे.

या पूर्वी २२ एप्रिलला प्रत्येकी १४ लाख रुपये बक्षीस असलेल्या एक महिला नक्षलवादी क्षेत्र कमांडर टांडा दलम ची सुनीता आणि टांडा दलममधील एरिया कमांडर आणि सध्या विस्तार दलममध्ये कार्यरत असलेल्या नक्षलवादी कबीरच्या गार्ड असलेल्या खटिया मोचा दलम मधील सरिता यांना ही चकमकीत ठार करण्यात आले होते. त्यांच्याकडून बंदुका, काडतुसे, मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांची शस्त्रे आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले होते.

२९ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात हॉकर्स जवानांनी शौर्य दाखवून १ नक्षलवादी कमलूला ठार केले. कमलू कडे असलेली ३०-०६ रायफल जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस महानिरीक्षक संजय कुमार, बालाघाट जिला पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी पोलीस मुख्यालयात पत्र परिषद घेऊन या घटनेला दुजोरा देताना सांगितले की या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर या घनदाट परिसरातील जंगलात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें