सडक अर्जुनी, दि. 30 सप्टेंबर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध गीत गायन मंडळ चीचटोला व गांधर्व संगीत कलाकार परिषद साकोली यांच्या संयुक्त विधमाने एक दिवशीय कलाकार मेळावा दिनांक 29 सप्टेंबर रोजी सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाला आमदार मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सडक अर्जुनी नगर पंचायत चे नगर अध्यक्ष तेजराम मळावी उपस्थित होते, सत्कार मूर्ती माजी सरपंच जीवन लंजे ग्राम चीरचाडी, दिलीप कापगते माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष चीचटोला, मुनीश्वर कापगते माजी सरपंच चीचटोला, तसेच सुधाताई रहांगडाले जि. प. सदस्य गोंदिया, राजेश नंदागवळी माजी सभापती जी.प. गोंदिया, रमेश चुर्हे माजी जि. प. सदस्य, अविनाश काशिवार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सडक अर्जुनी, मुन्ना देशपांडे कॉन्ट्रॅक्टर सडक अर्जुनी.
अनिल राजगिरे नगर सेवक, रजनीताई गिऱ्हे पुंजे, छायाताई टेकाम माजी सरपंच रेंगेपार दल्ली, एफ. आर. टी. शाह, नगरसेवक महेंद्र वंजारी, पत्रकार सुशील लाडे, बबलु मारवाडे, मिर्ला गणवीर, राजेश मुनेस्वर, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित कलाकारांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे आयोजक अनिता बांबोळे माजी सरपंच चीचटोला यांच्या कडून कलाकारांना प्रसस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कलाकारांनी हजेरी लावली होती.