ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कसून मेहनत घेतली तर गावाचा विकास दूर नाही : आ. मनोहर चंद्रिकापुरे


  • अर्जुनी मोर. विधान सभा क्षेत्रात 7 कोटी 50 लक्ष रुपये च्या निधीतून विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.

सडक अर्जुनी., दी. 30 सप्टेंबर : गावाचा विकास करण्यासाठी सबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी विकासाचा वार्षिक आराखडा तयार करून तो पंचायत समिती, जिल्हा परिषद सोबत आमदाराकडे द्यावा आणि लोकप्रतिनिधीच्या समन्वयातूनच प्रत्येक गावाचा विकास साधावा, मग्रारोहयो च्या माध्यमातूनही गावात अनेक विकासाची कामे प्रस्तावित केली जातात, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कसून मेहनत घेतली तर गावाचा विकास दूर नाही.



आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी दिले. ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम शिलेझरी, बाकटी येथे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मंचावरून बोलत होते.

ग्राम शिलेझरी, बाकटी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 1 कोटी 72 लाख रुपयाचे सिमेंट रस्ता तथा बाकटी- सानगडी या डांबरीकरण रस्त्यासाठी 3 कोटी 52 लाख रुपये निधीचा रस्ता मंजूर करण्यात आला त्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन दी. 29 सप्टेंबर रोजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, शिलेझरीचे सरपंच सुखदेव मेंढे, माजी सरपंच सुनीता ब्राह्मणकर, सोमलपूरच्या सरपंच भूमिकाताई ढोक, बाकटी च्या सरपंच सरिता राजगिरे उपस्थित होत्या.

तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथे 14 लक्ष रुपयाच्या निधीतून मंजूर झालेले जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी सरपंच चित्राताई भेंडारकर, उप सरपंच अनिल बोरकर, पोलिस पाटील सुभाष मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य सुभांगी दहिवले, सुधाकर कुर्वे, राधिका धनबाते, शीतल मेश्राम, पल्लवी चांदेवार व शाळा समिती अध्यक्ष व अन्य गावकरी उपस्थित होते.

यावेळी आमदार मोहदयानीं नागरिकांशी विविध विषयावर चर्चा केली. दरम्यान आज 29 सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी लहान मोठे भूमिपूजन केल्याचे सांगितले. एकूण 7 कोटी 50 लक्ष रुपयाच्या मंजूर निधीतून भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाल्याचे सांगितले.


 

Leave a Comment

और पढ़ें