गोंदिया, दि. 28 सप्टेंबर : गोंदिया ते आमगाव मार्गावर असलेल्या ग्राम गोरठा येथील कालव्याजवळ झालेल्या ट्रॅक व दुचाकी वाहनाच्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या असून दुचाकी वाहन चालक गंभीर जख्मी झाल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : तलाठी व कोतवाल 20 हजार रुपयाची लाच प्रकरणी अडकला एसीबीच्या जाळ्यात!
आज गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास एक ट्रक आमगावकडे भरधाव वेगाने जात होता, दरम्यान टिप्परने ( ट्रॅक ) ने मोटारसायकल ला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकल वर सवार असलेल्या दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ट्रॅक क्रमांक एम. एच. 35 ए.जे. 1021 असे असून दुचाकी वाहन क्रमांक एम.एच. 35 एम. 7565 असे आहे. यात मृतक महिला सत्यशिला ब्रिजलाल बिसेन वय ( 36 ) व सुनीता सूरजलाल बिसेन वय ( 23 ) रा. पोकरटोला (टेकरी) ता. आमगाव यांचा समावेश आहे.
ग्राम ठाणा येथे मुलीच्या येथील घरगुती कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने गावाकडे जात असतांना ही घटना घडली. मोटारसायकल चालक दिपक बिसेन गंभीर जखमी असल्याने त्याला आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. माहिती मिळताच आमगाव पोलीसानी घटना स्थळ गाठले असून गंभीर जखमीला रूग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत.