- माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन आणि फलक अनावरण
प्रतिनिधी/अर्जुनी मोर, दी. 28 सप्टेंबर : मोरगांव अर्जुनी तालुक्यातील चिचोली आणि चिचोली नवीन येथे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन आणि फलक अनावरण करण्यात आले.
या निमित्ताने मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सर्व कार्यकर्त्याना माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी जनसेवेचा मूलमंत्र देत संघटना बळकटीकरण आणि विस्तारीकरण करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन केले.
यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, अर्जुनी मोरगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष विजय कापगते, अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, प्रकाश गहाणे, तालुका महामंत्री लैलेश्वर शिवणकर, युवा मोर्चा तालुका महामंत्री जितेंद्र साळवे तसेच मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.