गोंदिया, दि. 28 सप्टेंबर : निखिल पिंगळे पोलिस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलिस अधिक्षक गोंदिया यांच्या निर्देशान्वये, प्रमोद मडामे. उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे मार्गदर्शनाखाली 28 सप्टेबंर रोजी “आंतर राष्ट्रीय माहिती अधिकार दिन” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमा निमित्त शहीद मिश्रा ज्युनियर कॉलेज तिरोडा येथील विद्यार्थी व विद्याार्थीनी यांना माहितीचा अधिकार कायदा-2005 हा कायदा समाजावुन सांगण्यात आला तसेच त्या अनुषंगाने विद्यार्थी सोबत चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास शहीद मिश्रा ज्युनियर कॉलेज तिरोडा येथील विद्यार्थी व विद्याार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक प्रमोद मडामे. उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास बारापात्रे प्राचार्य, तसेच आभार प्रदर्शन तारेंद्र रंहागडाले, प्राध्यापक, शहीद मिश्रा ज्युनियर कॉलेज तिरोडा यांनी केले. सदर कार्यक्रमाचे संचालन पो. हवा लितेश गोस्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तिरोडा यांनी केले.
तसेच दिनांक 28 सप्टेंबर रोजी ईद –ए– मिलाद च्या अनुषंगाने आयोजित मिरवणुकी दरम्यान “ 28 सप्टेबंर आंतर राष्ट्रीय माहिती अधिकार दिन ” निमित्त माहितीचा अधिकार कायदा बाबत जनजागृती केली. सदर कार्यक्रमास हाजी अब्दुल सलाम शेख, सदर जामा मस्जिद तिरोडा व मिरवणुकीचे आयोजक यांचे सहकार्य लाभले.
