गोंदिया, दिं. 26 सप्टेंबर : गोंदिया शहर पोलीस स्टेशन मध्ये एका वकील सोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात वकील संघटना रस्त्यावर उतरले तर गोंदिया शहरातून मोर्चा काढत पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. सविस्तर वृत्त असे की : गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाचे वकील मनीष नेवारे यांच्याशी १५ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे ते काही कामानिमित्त गेले असता.
त्यांच्याशी अभद्र वागणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वायरल झाला आहे. त्यात ते आपल्या पदाचा कसा गैर वापर करतात आणि खाकी वर्दीचा कसा जोर दाखवतात त्याचे उदाहरण दिसत आहे. त्या मुळे गोंदिया येथील वकील संघटनांनी आज 25 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरत आंदोलन केले आहे.
यावेळी गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयात आंदोलन केल्यानंतर वकील संघटनांनी पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले व अभद्र वागणुक करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे. दरम्यान वकील संघाचे पदाधिकाऱ्यांनी पोलिस आपल्या पदाचा कसा गैर वापर करतात असे सांगितले आहे. जर वकील सोबत पोलिस अशी वागणूक देत असतील तर सामान्य माणसा बरोबर त्यांची वागणूक कसी असेल यावरून ते दिसून येते दरम्यान आंदोलन वेळी घोषणा बाजी करण्यात आली.
