- खा. सुनील मेंढे यांची मृतक कुटुंबाला सांत्वन भेट
सडक अर्जुनी, दि. 24 सप्टेंबर : तालुक्यातील घाटबोरी/कोहळी येथील शेतात तुटून पडलेल्या जीवंत ताराच्या स्पर्शाने मृत झालेल्या लंजे दांपत्यांच्या कुटुंबीयांची 23 सप्टेंबर रोजी खासदार सुनील मेंढे यांनी सांत्वन भेट घेतली. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले देखील उपस्थित होते.
ही घटना 20 सप्टेंबर रोजी घडली होती. तर शेतकरी तुळशीदास रेवाराम लंजे वय 45 वर्षे, त्यांची पत्नी सौ. मायाबाई तुळशीदास लंजे वय 42 वर्षे हे दोघेही जागीच ठार झाले तर सौ. इंदुबाई हिरालाल लंजे वय 43 वर्षे अंदाजे या जखमी अवस्थेत होत्या. या पूर्वी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी देखील कुटुंबाला सांत्वन भेट दिली होती.
यावेळी कुटुंबीयांना धीर देत शासनाकडून शक्य तेवढी मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचा शब्द खासदार सुनील मेंढे यांनी दिला. ज्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन जीव गेले, अशा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे व नागरिकांच्या समस्या न ऐकून घेणारे उपअभियंता नायडू यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, राजेश कठाने, जि.प. सदस्य निशाताई तोडासे, जि.प. सदस्य कविताताई रंगारी, पं.स. सदस्य चेतनभाऊ वडगाये, पं.स. सदस्य वर्षाताई शाहारे, गौरेश बावनकर व समस्त गावकरी उपस्थित होते.
