- रस्त्याच्या मागणीसाठी केले अन्नत्याग आंदोलन…
गोंदिया, दि. 20 सप्टेंबर : जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात अनेक कामे प्रभावित झाले आहेत. या समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनाचीही दखल घेण्यात आली नाही.
असा आरोप करत जि.प. सदस्या विमल कटरे यांनी गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. तर पंचायत समिती सदस्य रेखा फुंडे या देखील अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ते तिरखेडी रस्त्याचे तात्काळ खड्डे भरण्याचे काम करावे व दोन महिन्यात नवीन रस्ता बनविण्यात यावा, रेल्वेने ना हरकत देऊन सुद्धा धानोली-बाभणी मार्गाचे काम झालेले नाही. ते पूर्ण करावे या मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद सदस्या यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही. तोपर्यंत हा आंदोलन मागे घेणार नाही. अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली आहे. तर जिल्हा परिषद सदस्या विमल कटरे यांनी बांधकामं विभागाला 11 सप्टेंबर ला पत्र व्यवहार केल्यानंतर बांधकाम सभापती यांनी 13 सप्टेंबर ला जी. प. सदस्या विमल कटरे यांना मागणी केलेला रस्त्यालां मान्यता दिली असल्याचे पत्र दिल्याचे सांगतिले आहे. तरी देखील विमल कटरे हे आंदोलना बसले असून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बांधकामं सभापती टेभरे यांनी सांगितले आहे. तर आंदोलकांनी आज 21 सप्टेंबर रोजी सदर आंदोलन मागे घेतले आहे.