भिके तुन मिळालेले पैसे पाठविले राज्य सरकारला…
गोंदिया, दी. 21 सप्टेंबर : राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांन करिता 72 वस्तीगृहे राज्य सरकारने मंजूर केली आहेत. मात्र निधी अभावी हे वस्तीगृह राज्य सरकारने सुरु न केल्याने गोंदियात आज 20 सप्टेंबर रोजी ओबीसी समाज बांधवानी शहरात भीक मागो आंदोलन करून भिकेतून मिळालेले पैसे राज्याचे उप मुख्यमंत्री तसेच अर्थ मंत्री अजित पवार यांना मनी ऑर्डर करुन पैसे पाठविले आहे.
सरकारने ओबीसी वसतिगृहकडे दुर्लक्ष केल्याने हा भीक मागो आंदोलन करण्यात आला असून आतातरी राज्य सरकारने ओबीसी समजाची दखल घेतली नाही तर यापुढे भव्य आंदोलन करू असा इशारा ओबीसी बांधवानी दिला आहे. यावेळी ओबीसी नेते खेमेंद्र कटरे, अशोक लंजे आणि अन्य ओबीसी बांधव उपस्थित होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 55