मृतक लंजे दाम्पत्यांच्या कुटुंबाला आ. चंद्रिकापुरे यांची सांत्वन भेट


सडक अर्जुनी, दि. 21 सप्टेंबर : आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी घाटबोरी/कोहळी गावात पोहोचून जिवीत वाहिनीच्या स्पर्शाने मृत्युमुखी पडलेल्या लंजे दाम्पत्य यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 20 सप्टेंबर रोजी शेतात निंदण करण्यासाठी गेलेले श्री. तुळशीदास रेवाराम लंजे, सौ. माया तुळशीदास लंजे यांचा जिवीत वाहिनीच्या स्पर्शाने मृत्यू झाला होता. तसेच सौ. इंदू हिरालाल लंजे या जखमी झालेल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच आमदारांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही दुःखद घटना असल्याचे आमदार म्हणाले. या घटनेचे आम्हाला अतीव दुःख झाले आहे. शासकीय नियमानुसार मृतांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत केली जाईल. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुर्हे, सरपंच भूमिका बाळबुद्धे, एम.एस.सी.बी. चे उपकार्यकारी अभियंता नायडू, भुमेश्वर लंजे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें