बैल पोळा केवळ शेतकऱ्यांचा उत्सव नाही तर सर्वसामान्यांचा उत्सव – हर्ष मोदी


सडक अर्जुनी, दी, 14 सप्टेंबर : बैलपोळा हा केवळ शेतकऱ्यांचाच नाही तर सर्वसामान्यांचा सण आहे. शेतकरी आणि शेती यामुळे सर्वसामान्य जनतेच्या ताटात अन्न पुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संबंधी असलेले प्रत्येक उत्सव हे केवळ शेतकऱ्यांच्या सण नसून संपूर्ण नागरिकांचा सण आहे. शेतकरी मला नेमही प्रेरणा देतात आणि कितीही मोठे संकट आले तरी त्याचा सामना करण्याचे सामर्थ्य प्रदान करतात.

ज्या परिस्थितीत शेतकरी शेती करतात त्या परिस्थितीत जीवन जगणे कठीण जरी असेल तरी त्या संकटांवर मात करत सामोरे जात जीवन जगत असतात. हेच संघर्ष माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. अस प्रतिपादन सौंदड ग्राम पंचायत चे सरपंच हर्ष मोदी यांनी व्यक्त केले.

ते ग्राम पंचायत सौंदड येथे आयोजित बैलपोळा उत्सव स्पर्धे दरम्यान कार्यक्रम मार्गदर्शन करताना बोलत होते. या स्पर्धेत १०० पेक्षा जास्त बैलजोड्यानी सहभाग नोंदवून कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोड्यांना सजऊन पोळ्याच्या ठिकाणी उपस्थित केले होते. स्पर्धेत यशवंत विठ्ठले यांच्या बैल जोडीला प्रथम पारितोषिक ५१०० रुपये, द्वितीय पारितोषिक सावन इराले यांच्या बैल जोडीला ३१०० रुपये आणि तिसरे पारितोषिक दुर्योधन येरने यांच्या बैल जोडीला २१०० रुपये तर इतर सर्व सहभागी जोड्यांना ५०० रुपये प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमात सरपंच हर्ष मोदी, कुंदा साखरे, मदन साखरे, शुभम जनबंधू, प्रमिला निर्वाण, विजय चोपकर, शुषमा राऊत, खुशाल ब्राह्मणकर, रंजना भोई, अर्चना चन्ने, तंटा मुक्ती अध्यक्ष चरणदास शहारे, व्यापारी समिती चे अध्यक्ष संदीप मोदी, ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष विक्की पांडे, पुरुषोत्तम निंबेकर, शंकर पटाचे अध्यक्ष ग्यानिराम किरनापुरे, बाजार समिती चे अध्यक्ष धनराज डोंगरवार व मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकरी राजा आता तंत्रज्ञानाच्या युगात यंत्राच्या साहाय्याने शेती करत आहे. त्या मुळे शेती उपयोगी जनावरे विलुप्त होत चाललेली आहेत. बेळजोड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्या मुळे ग्रामीण भागात आता जनावरांची संख्या देखील कमी होत आहे. त्या मुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करून जनावरांना जोपासले पाहिजे असे आव्हान दरम्यान करण्यात आले, असे असले तरी आज झालेल्या बैल पोळ्यात जनावरांची संख्या चांगली होती. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावली. पावसात शेतकरी आपल्या बैल जोड्यांना घेऊन उभे होते. हे मनमोहक दृष पाहण्यासाठी मिळाले.


 

Leave a Comment

और पढ़ें