- महामार्ग पोलिसांच्या सतर्कते मुळे 5 आरोपी, 5 दुर्मीळ जवंत पक्षी व 2 वाहने ताब्यात.
- गुजरात चे 5 आरोपी सडक अर्जुनी वन विभागाच्या ताब्यात.
- कलकत्ता वरून मुंबई ला वाहनातून पक्ष्यांची तस्करी
- तस्करीचे रॅकेट उघड
सडक / अर्जुनी, गोंदिया, ( बबलु मारवाडे ), दी. 14 सप्टेंबर 2023 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर महामार्ग पोलीस गस्तीवर असताना दोन संसईत वाहन दिसून आल्याने महामार्ग पोलिसांनी त्याची तपासणी केली असता सदर वाहनात 5 पक्षी मिळून आले. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, पुढील कारवाई करीता वन विभागाच्या ताब्यात 5 आरोपी, 5 जिवंत पक्षी व 2 वाहने दिले.
सविस्तर वृत्त असे की : महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव जिल्हा गोंदिया येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेशकुमार लिल्हारे, पोलीस नायक बनोठे, पोलीस शिपाई अली हे दि. 12 सप्टेंबर रोजी 5 वाजता दरम्यान शासकीय वाहनाने महामार्ग क्र : 53 वर गस्त करीत असताना ग्राम बाम्हणी येथे त्यांना दोन वाहन शंसयास्पद रित्या दिसुन आले.
त्यामुळे त्यांनी दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यातील टोयोटा कंपनीची इनोव्हा वाहन क्र : जी. जे. 05 जे. बी. 7737 असे असून दुसरे वाहन क्रमांक : सुझुकी कंपनीची ब्रेझा जी. जे. 05 आर. ई . 7430 असे आहेत.
वाहन क्र : जी. जे. 05 जे. बी. 7737 मध्ये दोन ईसम दिसुन आले व कार च्या मागील बाजुस 5 मोठे पक्षी दिसुन आल्याने वाहन चालक यांना पोलिसांनी विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नाव समीर शाकीर मन्सुरी वय 29 वर्ष, हजरुददीन गुलाब मोयुददीन मौलवी वय 25 वर्ष दोन्ही रा. सुरत राज्य गुजरात असे सांगितले आहे.
तसेच त्यांच्या सोबत असलेले दुसरे वाहन सुझुकी ब्रेझा वाहन क्रमांक : जी. जे. 05 आर. ई. 7430 मध्ये असलेले ईसम 1) मुसा शेख वय 24 वर्ष, 2) शहजाद शेख सकील वय 29 वर्ष, 3) पठाण हुसेन गुलाम साबीर वय 19 वर्ष, तिन्ही रा. भिंडीबाजार, सुरत राज्य गुजरात असे सांगितले.
वरील पाचही आरोपी हे कलकत्ता वरून मुंबई ला पक्षी घेऊन जात होते. पक्ष्यांची बारकाईने पाहणी केली असता दुर्मिळ पक्षी कॉमन क्रेन ( सारस प्रजाती ) चे पक्षी असल्याचे सांगितले आहे. वरील पाचही ईसम हे त्यांचे ताब्यातील वाहन मध्ये वन्यजिव दृष्ट्या संरक्षित व दुर्मिळ असलेले कॉमन क्रेन पक्ष्यांची गैरमार्गीने बेकायदेशीर तस्करी करीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाने 5 आरोपी, 5 जिवंत पक्षी व 2 वाहने वन विभागाच्या ताब्यात दिले आहेत.
वन विभागाने 5 आरोपी विरुध्द वण्यजीव अधिनियम 1972 चे कलम 2 (16), 9, 39, 49 अन्वय गुन्हा नोंद केला आहे. कॉमन क्रेन हा पक्षी संरक्षित पक्षी असून अनुसूची (आय ) भाग ( ब) असे आहे. आरोपींना 13 सप्टेंबर रोजी तालुका न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 सप्टेंबर पर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. वन विभाग घटनेचा कसून तपास करीत आहे.
जी. एस. राठोड सहाय्यक वन संरक्षक वन विभाग गोंदिया यांच्या मार्गदर्शनात एम. के. गडवे वन परिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी हे तपास करीत आहेत. त्यांच्या सोबत एन. डी. वाढई क्षेत्र सहाय्यक कोहमरा, डी. एल. धूर्वे क्षेत्र सहाय्यक गोरेगाव, पी.एम. पटले बीट रक्षक, डी. डी. माहुरे बीट रक्षक, संतोष कटरे बीट रक्षक, मनोज शाहारे बीट रक्षक, टी.पी. चव्हाण बीट रक्षक व इतर कर्मचारी करीत आहे.
