सडक अर्जुनी, दि. 13 सप्टेंबर 2023 : सामाजिक कार्यकर्ते रोशन बडोले हे 16 सप्टेंबर पासून नगर पंचायत सडक अर्जुनी समोर धरणे आंदोलन करणार होते. मात्र त्यांच्या मागण्यांना लक्ष्यात घेता नगर पंचायत सडक अर्जुनी यांनी सदर कामे करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने बडोले यांनी धरणे आंदोलन मागे घेतले आहे.
निवेदनाच्या अनुषगान, सडक अर्जुनी ते कोहमारा मार्गावरील मोरेश्वर राऊत गुरुजी यांच्या घरापासून ते लंजे फेब्रिकेशन पर्यंत मार्गाच्या बाजुला सतत सांडपाणी वाहात आहे.
वार्ड क्र. 17 मध्ये राहणार्या नागरीकांना तसेच परिसरातील राजीव गांधी महाविद्यालय, एच.एन.टी. विद्यालयाच्या विद्याथ्यांना तसेच रविनंदा पब्लिक स्कूल च्या लहान मुलांना या सांडपाण्या पासून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
असे लेखी पत्र 1 सप्टेंबर 2023 रोजी नगर पंचायत सडक अर्जुनी यांना रोशन बडोले सामाजिक कार्यकर्ते यांनी दिले होते. त्या अनुसंघाने 5 सप्टेंबर रोजी नगर पंचायत कडून बडोले यांना लेखी स्वरूपाचे पत्र दिले.
की आपल्या पत्राच्या अनुषंगाने कार्यालयाकडून वेळोवळी कच्ची नाली खोदून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. नगर पंचायत सभेमध्ये योग्य उपाययोजना व पाण्याचा निचरा करण्यासाठी सन्माननिय अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांध. सभापती व सदस्य यांनी या कार्यालयास कळविले. त्यानुषंगाने या कार्यालयाकडून सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य ती आवश्यक उपाययोजना माहे सप्टेंबर 2023 पूर्वी करण्यात येणार आहे.
त्या मुळे लेखी आश्वासनानुसार दिनांक 16 सप्टेंबर रोजी न. पं. कार्यालयासमोरील होणारे धरणे आंदोलन मागे घेत असल्याचे रोशन खुशाल बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
