सडक अर्जुनी येथे शरद पवार गटाची आढावा बैठक संपन्न.


सडक अर्जुनी, दी. 13 सप्टेंबर 2023 : जिल्ह्यात तळागळातील लोकांपर्यंत शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार पोहचविण्यासाठी आपण आपल्या तालुक्यातील तालुका कार्यकारिणी निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या काळात पक्ष संघटना मजबूत करून चांगला संघटन तयार होईल. लवकरच आपल्या तालुक्याच्या तालुका व जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असे प्रतिपादन बजरंगसींह परीहार प्रभारी गोंदिया यांनी केले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित दिनानाथ पडोळे माजी आमदार, मिथुन मेश्राम, दिनेश कोरे, रेहपाडे सर, रुखीराम वाढई, देवानंद तागडे, अशोक हुकरे, नितेश खोटेले, नामदेव पातोडे, राहुल भोयर, सुरेश खोब्रागडे, नितिन ढोटे, आनंद ईळपाते, अमन मेश्राम, मितेश कोरे, उद्धव कावळे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे दी. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता कार्यक्रम संपन्न झाला.


 

Leave a Comment

और पढ़ें