सौंदड, दी. 13 सप्टेंबर 2023 : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय सौंदड येथे दिं. 12 सप्टेंबर 2023 ला विद्यालयात “आजी आजोबा” दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव घाटबांधे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी शाळा समितीचे सदस्य शमीम अहमद, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, बारापात्रे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्णे, डाखोळे ताई, उमा बाच्छल तसेच शिक्षिका प्रतिभा भेंडारकर, योगिता बोरकर, देंवेंद्र निमजे उपस्थित होते. सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित सर्व आजी आजोबांचे नातवंडानी मोठ्या प्रेमाने पुष्पगुच्छ व पुष्पहारांनी स्वागत केले. यावेळी आजी आजोबा उपक्रमाबद्दल कल्पना काळे यांनी माहिती दिली. या प्रसंगी नातवंड व आजी आजोबांनी आपले अनुभव व प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव घाटबांधे यांनी संस्कारक्षम विदयार्थी घडविण्यासाठी आजी आजोबांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे मार्गदर्शन केले.
विदयालयाचे प्राचार्य मधुसूदन अग्रवाल यांनी आजी आजोबा यांचे नातवांशी असलेले घनिष्ट नातं व त्यांची जडण—घडण पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असल्याचे मार्गदर्शन केले. प्रसंगी शमीम अहमद लो. शि. स. सदस्य, पर्यवेक्षक डी. एस. टेंभूर्णे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कल्पना काळे यांनी केले तर आभार उमा बाच्छल यांनी मानले.
