9 कोटी 82 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.
सडक / अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 11 सप्टेंबर 2023 : नागरिकांनी आमदाराला प्रश्न विचारले पाहिजे आम्ही लोक प्रतिनिधी आहोत, नागरिकांचे कामे करण्यासाठी खुर्चीवर बसलो आहोत, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यानि मंचावरून बोलताना केले ते दी. 10 सप्टेंबर रोजी आपल्या विधान सभा क्षेत्रातील ग्राम दोडके जांभळी येथे मुख्य मंत्री ग्राम सडक यौजने अंतर्गत मंजूर रस्त्याच्या भूमी पूजन प्रसंगी उपस्थित नागरीकांना मंचावरून संबोधित होते.
ते पुढे म्हणाले तुम्ही बोलणार नाही. तर आम्हाला कळणार असे की तुमच्या समस्या काय आहेत. त्या मुळे बोला आणि आठवण करून द्या. साहेब आमच्या कामाचे काय झाले. तुम्ही आश्वासन दिले होते त्याचे. त्यामुळे आम्हाला देखील कळकळ लागेल तुमच्या कामाची. माझे आपल्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं आहे. हे मी कबूल करतोय. आज मी याठिकाणी आलो आणि अनेकांनी विकास कामे करण्यासाठी निवेदन दिल आहेत.
मी नक्कीच तुमच्या कामांना तात्काळ मंजूर करण्याचे प्रयत्न करणार, दरम्यान कार्यक्रम प्रसंगी गावात नव्याने 20 लक्ष रुपये किमतीचे 2 विकास कामांना तात्काळ मंजुरी दिली. ते पुढे म्हणाले की मी एक मात्र असा आमदार आहे की तब्बल 50 लक्ष रुपये किमतीचे पुस्तक वाचनालयाना वाटली आहेत. त्या मुळे गावात वाचनालय देखील खूप महत्त्वाचे आहेत. त्या मुळे मानसाच्या बुध्दीचा विकास होतो.
यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी उपस्थित आमदार मनोहर चंद्रिकापुरे, शालिंदर कापगते उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी, रंजीता कोराम सरपंच ग्रा.प. जांभळी, विजयकुमार सोनवाणे उपसरपंच, गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष टिकाराम कावळे, गिरधारी कुतिरकर ग्रा. प. सदस्य, श्रीनिवास पटकलवार ग्रा.प. सदस्य, पोलीस पाटील सोहम मलकाम, नेहरू ऊईके पोलीस पाटील, रामेश्वर मेंढे शाळा सुधार समिती अध्यक्ष, जयंत राणा अमरावतीकर, अनिल मुनेश्वर पत्रकार, ग्रा. प. सदस्य रंजना उईके, व ग्रामस्थ उपस्थित होते.
10 सप्टेंबर रोजी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विविध ठिकाणी 9 कोटी 82 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले. यात मुंडीपार/ईश्वर, पांढरी, दोडके/ जांभळी, तसेच गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा, हौसीटोला या गावातील भूमिपूजन केले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या विधान सभा क्षेत्रात विकास कामे करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
