पांढरी ग्राम वाशियांचे आमदारांना निवेदन


सडक/अर्जुनी, दि. ०९ सप्टेंबर : तालुक्यातील ग्राम गोंगले / पांढरी येथील रेल्वे स्टेशन क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची भेट घेतली, भेटी दरम्यान त्यांनी आपल्या समस्या आमदार मोह्दयांना सांगितल्या, नागरीकांच सांगणे आहे की त्यांना  रेल्वेरुळावरूण ये – जा करताना मोठी कसरत करावी लागते. कारण रेल्वेप्रशासनाने मागिल दोन वर्षापासुन सदर मार्गावर अश्लेली रेल्वे गेट बंद केली, त्या मुळे रेल्वे मार्गाच्या पलीकडे वास्तव्यास असलेल्या नागरीकांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

रेल्वे स्टेशन पासुन किमान 2 किलोमीटर पेक्षा लांब असलेल्या भुयारी मार्गातुन सद्या ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना दवाखान्यात जाण्यास व लहान मुलांना शाळेत जाण्यास 5 किलोमीटर चा लांब प्रवाश करावा लागतो. सबब पुर्वीप्रमाणेच रेल्वेमार्ग करुण देण्याची मागणी पांढरी येथील नागरीकांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन देऊन केली, दि. ०८ सप्टेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात भेट दिली.

भुयारी मार्गाचे काम रेल्वे करण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी येणारा खर्च राज्य शासनाने प्रथम रेल्वे प्रशासनाकडे जमा करावा अशी अट घातली आहे. सबब सधारण दिड ते दोन कोटी एवढा निधी राज्य शासनाकडुन प्राप्त करुण देण्यासाठी अजित पवार उपमुख्यमंत्री यांना भेटुन निधी मंजुर करण्यात येईल असे आश्वासन आमदार मोहोदयानी नागरिकांना दिले.

यावेळी कुषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक डी. यु. रहांगडाले, सरपंच गोगले श्यामकला करचाल, डॉ. पारधी, श्याम गजबे, विनोद खोबरे, तेजराम भोयर, सेवक भोयर, नोवित भोयर, ज्योती अंबुले, गीता भोयर, कचराबाई राऊत, ओमकार हटवार, वनिता प्रधान, मालान भोयर, लीला गुंडरे, अंतकला बागडकर, ताराबाई राऊत, तसेच पांढरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें