सडक / अर्जुनी, दि. ०७ सप्टेंबर २०२३ : पोलिस पाटील जिल्हा संघटनेची आढावा बैठक मांडोदेवी येथे ०५ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यकार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर उपस्थित होते. सभेत ठरविलेल्या विषयाच्या अनुक्रमे सभा घेण्यात आली. मागील सभेचे वाचन करून, नवनियुक्त उपशाखा सालेकसा व डूग्गिपार कार्यकारी मंडळाचे जिल्हा कार्यकारणीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभकामना देण्यात आल्या.
त्यानंतर प्रत्येक उपशाखा अध्यक्षांनी आप-आपल्या उपशाखेचा आढावा सादर केला. प्रत्येकानी मुद्देसूद आपल्या अडचणी व संघटनेचा सुरू असलेल्या घडामोडी विषयी विस्तृत संकल्पना ठेवली. सगळ्या उपशाखेचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सभेचे अध्यक्ष श्री. परशुरामकर यांनी उपशाखा अध्यक्ष गजानन जांभूळकर यांचे सांगितल्यावरून ( सहसचिव यांनी आपल्याली प्रकृती बरी नसल्याचे बोलले, मात्र त्यांना वेळ देता येत नाही. ) म्हणून जिल्हा सहसचिव बाळकृष्ण शहारे यांचा राजीनामा मंजूर तर जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम व जिल्हा सचिव राजेश बन्सोड यांचा राजीनामा उपस्थित सभेच्या वतीने नामंजूर करण्यात आला.
कार्यकारणीच्या विस्तारा बद्दल वेळे अभावी पुढील सभेत नर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा सचिव राजेश बन्सोड यांनी ठेवली तर सभेत दिलीप मेश्राम जिल्हा अध्यक्ष, रमेश टेंभरे जिल्हा उपाध्यक्ष, श्रीराम झिंगरे कोषाध्यक्ष, जि. म. अध्यक्षा नंदाताई ठाकरे, अनिताताई लंजे जि. म. उपाध्यक्षा, दुर्गावती कापसे जि. म. सचिव, लालचंद मच्छीये, प्रकाश कठाने, गजानन जांभूळकर, बनमाली मंडल, टीकाराम कापगते, राष्ट्रपाल भोवते, सुरेश बोरकर, मिताराम नागोसे, चंद्रहास भांडारकर, भूषण उके जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पोलिस पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमगाव उपशाखा अध्यक्ष लोकचंद भांडारकर, शिवलाल सराटे, नीलचंद बिसेन, देवेंद्र भांडारकर, ओमप्रकाश हत्तीमारे, धनपाल ठाकरे, रमेश बावनकर व आमगाव येथील सर्वच पोलिस पाटलांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन विलास साखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेमलाल टेंभरे यांनी मानले.
