सौंदड, ०६ सप्टेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुणादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेनुसार दि. ५ सप्टेंबर २०२३ ला विद्यालयात भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ . सर्वपल्ली राधाकृषणन् यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आ. न. घाटबांधे, संस्था उपाध्यक्ष प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चीखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी तसेच शिक्षकांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृषणन् यांच्या महान कार्याची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी गीत व भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृषणन् यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात वर्ग १ ते १२ च्या विद्यार्थांसाठी स्वयंशासन उपक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थांनी प्राचार्य, शिक्षक, पर्यवेक्षक, शारीरिक शिक्षक, चपराशी अशा त्यांना दिलेल्या भूमिका वेळापत्रकानुसार सुव्यवस्थितरित्या पार पाडल्या व आपल्या जबाबदारीचे पालन केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कर्तव्याविषयीची जाणीव झाली. अनेक व्यक्तिमत्त्व विकासाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
विद्यार्थांनी दिलेले कार्य व्यवस्थित पार पाडल्यामुळे प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्णे प्राध्यापक आर. एन. अग्रवाल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थांचे खूप प्रसंशा करून अभिनंदन केले. त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कु. वैभवी गहाणे व कू. योगेश्वरी इरले यांनी केले तर आभार कू. रिया पाऊलझगडे हिने मानले.