दोन वाळू माफियांच्या वाहनावर उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई!


अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या लोकांकडे तालुका प्रशासनाचे सर्रास दुर्लक्षच!


सडक/ अर्जुनी, दि. 02 सप्टेंबर : तालुक्यात वीणा परवाना वाळू वाहतूक करण्याचे काम सध्या जोमात चालू आहे. त्या मुळे शनीवारी 02 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता दरम्यान दोन वाहनावर उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शाहारे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहन धारकावर जप्तीची कारवाई केली आहे.



उपविभाग अधिकारी वरून कुमार शाहारे हे अर्जुनी मोरगाव वरून सडक अर्जुनी कडे सकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान आपल्या वाहनाने येत होते. दरम्यान कोकणा ते कोहमारा या मार्गावर त्यांना दोन ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करताना दिसून आले. त्यांनी वाहन थांबऊन वाळू वाहतूक करण्याचा परवाना बाबद विचारले असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध नव्हता. त्या मुळे दोन ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली.

1) वाहन क्रमांक : एम.एच. 35 जी. 2492 असे असून ट्रॉली क्रमांक उपलब्ध नाही. तर वाहन चालक : जयलाल फुलचंद म्हरस्कोल्हे असे असून वाहन मालक : वामन आनंदराव खोटेले दोन्ही राहणार कोहळी टोला असे आहे.

2) दुसरे वाहन क्रमांक : एम.एच. 35 ए.जी. 8513 असे आहे. तर ट्रॉली क्रमांक एम. एच. 35 एफ 4256 असे आहे. वाहन चालक : रवींद्र हरिदास इरले, व वाहन मालक : राजेंद्र ऊर्फ ( बापू ) हरिश्चंद्र भेंडारकर, दोन्ही राहणार सौंदड असे आहेत.

राजेंद्र ऊर्फ ( बापू ) हरिश्चंद्र भेंडारकर हे वाळू चोर नसून ते रॉयल्टी ची वाळू वाहतूक करतात. असे त्यांनी एका तक्रारीवर पोलिसांना दिलेल्या एका बयान मध्ये म्हंटले आहे. मात्र त्यांच्या वाहनावर झालेल्या कारवाई वरून हे शिध्द होते की ते सतत अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करतात. ते वाळू चोरीचा वेवसाय करतात.

सध्या तालुक्यात वाळू उत्खनन करण्याचा आणि वाहतूक करण्याचा परवाना नाही. असे असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून वाहतूक करण्याचा सपाटा चालू आहे. तालुका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा वेवसाय फलत फुलत आहे.

अश्यात तालुक्यातील महसूल विभाग निंद्रिय अवस्थेत आहे की काय ? अशी जन माणसात चर्चा आहे. तालुक्यातील तहसीलदार व तलाठी या वाहतुकीवर नियंत्रण का? करू शकत नाही. हा चर्चेचा विषय बनला आहे.

तालुक्यात 2 तहसीलदार, 3 नायब तहसिलदार, 4 मंडळ अधिकारी व 18 ते 20 तलाठी कार्येरत आहेत. अंदाजे 30 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असताना देखील तालुक्यातून अवैध गौन खनिज वाहतुकीवर नियंत्रण नाही.

ज्या गावात तलाठ्याला मुख्यालय मिळाले तेथे सदर तलाठी राहत नाहीत. काही तलाठी देवरी, साकोली, अर्जुनी मोर, सडक अर्जुनी अश्या दूर सहराच्या ठिकाणी राहून ये जा करतात.

त्या मुळे आपल्या कार्यालयात 11 वाजे येतात तर 4 वाजता घरी निघून जातात. त्या मुळे तालुक्यातील ग्रामीण भातून वाळूचा अवैध उपसा नियमित सुरू असतो. तलाठ्यांना महिन्याला दाबून पगार मिळतोय त्यात घर भाडे भत्ता देखील मिळतोय. तरी देखील संबंधित कर्मचारी आपल्या मुख्यालई राहत नाही. यावर उपविभागीय अधिकारी वरून कुमार शाहारे आणि जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद गोंदिया यांनी कर्मचारी मुख्यालई रहण्यांबंधने पत्र देखील काढला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें