राष्ट्रवादी च्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस बांधवांना बांधली राखी


सडक अर्जुनी, दि. ०२ सप्टेंबर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘एक धागा मायेचा’ या अभियानाच्या माध्यमातून सडक अर्जुनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डुग्गीपार पोलिस स्टेशनमध्ये पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. या प्रंसगी महिला तालुका अध्यक्ष रंजनी गिऱ्हेपुंजे, मंजु डोंगरवार माजी पंचायत समिती सदस्य, लता गहाणे सरपंच, अनिता बांबोडे माजी सरपंच, पुष्मामाला बडोले माजी सरपंच,रेखा कोसरकर माजी सरपंच, वंदना थोटे माजी सरपंच, तेजस्विनी पटले माजी सरपंच, रीता यावलकर ओबीसी सेल, अफरोज शेख, शुभांगी वाढवे, पुष्पा गुप्ता, प्रमिला बडवाईक, उषा होळकर, स्विटी यावलकर, रोशनी सारंगपुरे सह पोलिश बांधव देखील उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें