नांदेड, विशेष प्रतिनिधी, दि. ०२ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ता. मुखेड आगाराची मुखेड येवती हसनाळ बस ही नियमित व वेळेवर येत नसल्यामुळे अनेक प्रवाशी, व विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. हा मार्ग डोंगराळ भागात असल्यामुळे प्रायव्हेट वाहतूक सुविधा कमी प्रमाणात आहे. तालुक्यावर कामानिमित्त येणार्या प्रवासी लोकांची संख्या जास्त आहे. हॉस्पिटल, तहसिल, पंचायत समिती, शाळा अशा विविध प्रकारच्या कामासाठी प्रवासी प्रवास करण्याची संख्या असताना सुद्धा मुखेड आगाराचे आगार प्रमुख यांनी विविध कारणे सांगुन बस दरदिवशी व वेळेवर सोडत नसल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसूरकर यांनी आगार प्रमुखांना फोनवर विनंती केली होती.
मात्र वारंवार तेच परिस्थिती निर्माण होत होती. त्या नंतर शिंदे यांनी महाव्यवस्थापक (वाह) रा.प.मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्याकडे सविस्तर तक्रार केली. त्यानंतर महाव्यवस्थापक मुंबई यांनी विषयाची तात्काळ दखल घेऊन विभाग नियंत्रण रा.प. नांदेड यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुशंगाने रा.प. नांदेड यांनी मुखेड आगार प्रमुखांना प्रत्र पाठऊन अहवाल मागीतला आहे. त्यांनंतर आगार प्रमुखांनी माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसूरकर यांना दुरध्वनी वरून आश्वासन दिले की. मुखेड येवती हसनाळ ही बस वेळेवर व दरदिवशी सोडण्यात येईल. पण पाठपुरावा चालू राहील असे माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसूरकर यांनी सांगितले आहे.