पावसाने उसंत देताच वाळू माफिया झाले सक्रिय, तालुका प्रशासनाचे सर्राष दुर्लक्ष!



सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) , दिं, 02 सप्टेंबर : सध्या पावसाळा सुरू आहे. अश्यात नदी व नाल्यामध्ये जाणारे मार्ग चिखलाने खराब असतात. तर नदी नाल्यांमध्ये पाणी भरले राहते. त्यामूळे वाळू माफिया आपली वाहने नदी किंवा नाल्यात वाळू उपसा करण्यासाठी घालत नाही.



त्या मुळे पावसाळ्यात बांधकामांना वाळू मिळत नाही. त्यामुळेच पावसाळ्यात वाळूचे भाव गगनाला भिडले असतात. सध्या पावसाने उसंत दिल्याने वाळू माफियांची चांदी झाली आहे. सध्या मिळेल त्या जागेतून वाळूची चोरी खुले आम चालू आहे. त्यामुळे तालुका प्रशासन निंद्रा अवस्थेत आहे की काय अशी चर्चा सर्वत्र जन माणसात चालू आहे.

गौण खनिजाची होत असलेली चोरी ही काही नवीन नाही. तालुक्यातील सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना या बद्दल माहिती आहे. त्यात एका अधिकाऱ्यावर चौकशी देखील लागली होती. मात्र त्याचे पुढे काय झालं ते सांगता येणार नाही.

तालुक्यातील तालुका तहसीलदार, वन विभागचे आर. एफ. ओ. आणि पोलिस विभागाचे ठाणेदार यांच्या हाताखाली शेकडो कर्मचारी तालुक्यात कार्यरत आहेत. असे असले तरी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कधी कारवाई झालीच तर बोटावर मोजण्या सारख्या होतात.

तालुक्यात अवैध वाहतूक थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासना कडून कुठलीही ठोस उपाय योजना अद्याप तरी करण्यात आली नाही. दरवर्षी तालुक्यातून कोट्यावधी रुपयाचा महसूल चोरी होतो. याला जबाबदार कोण ? हा चिंतेचा विषय आहे.

सध्या वाळूचे रेट गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी बैल बंडी धारक नदी पात्रातून वाळू बाहेर काढून देतात. त्या वाळूची डंपिंग केली जाते. तर तीच वाळू लेबर किवा जेसीबी च्या साह्याने ट्रॅक मध्ये भरून विक्रीला पाठविली जाते. आज एक ब्रास वाळूची किंमत 2 ते 5 हजार रुपये आहे. तर दोन ब्राश वाळूचा ट्रॅक 7 ते 10 हजार रुपये किमतीने विकला जातो.

त्या मुळे कथित वाळू माफिया धनवान झाले असून तालुक्यात अनेकांकडे 2 ते 3 ट्रॅक्टर, 1 ते 2 ट्रॅक व आलिशान चारचाकी वाहनाने फिरताना दिसतात. ही उन्नती तालुका अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाली असून चोरांनी एवढी उन्नती केली तर अधिकाऱ्यांनी किती उन्नती केली असावी याचा शोध संबंधित अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांनी घेणे गरजेचे आहे. नियमित होत असलेल्या चोरीवर लगाम कोण घालणार हा चिंतेचा विषय ठरला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें