“माझा भाऊ सरपंच” कार्यक्रम ३१ ला, सरपंच हर्ष मोदी यांचा स्तुत्य उपक्रम… 


प्रतिनिधी / सडक अर्जुनी, दि. 30 ऑगस्ट 2023 : तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सर्वाधिक चर्चेत असलेली ग्राम पंचायत म्हणजे सौंदड आता एका नवीन उपक्रमासाठी चर्चेत आली आहे. रक्षाबंधन उत्सव निमित्त सरपंच हर्ष मोदी यांच्या संकल्पनेतून ग्राम पंचायतीने “माझा भाऊ सरपंच” कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

३१ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या उपलक्षावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील प्रत्येक वार्डात हा कार्यक्रम होणार असून गावातील सर्व महिला वर्गाला या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी सकाळी १०.३० वाजता वार्ड क्र. १ येथील दुर्गा मंदिर, ११.३० वाजता शिव मंदिर वार्ड क्र. २ , १२.०० वाजता हनुमान मंदिर वार्ड क्र. ३ , १२.३० वाजता संविधान चौक तर दुपारी १.०० वाजता गणेश मंदिर वार्ड क्र. ५ येथे महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच हर्ष मोडी यांच्या माध्यमाने करण्यात आला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें