हरिष बनसोड यांचा भाजप पक्षाला रामराम ठोकत काँग्रेश मध्ये प्रवेश! 


गोंदिया, ( बबलु मारवाडे ), दि. 29 ऑगस्ट : भाजपचे कार्यकर्ते अचानक काँग्रेस मध्ये गेल्याने सडक अर्जुनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच सडक अर्जुनी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिति चे संचालक झालेले आणि सावंगी येथील युवा उद्योजक हरिष बन्सोड व त्यांचा मुलगा सुमेध बन्सोड यांनी आज 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन मुंबई च्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या खांद्यावर दुपट्टा टाकून त्यांचा पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश महामंत्री देवानंद पवार उपस्थित होते. बनसोडे हे मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मध्ये काम करीत होते. मात्र भाजपाची विचार धारा बहुजन समाजाचा घात करणारी असल्यामुळे त्यांनी आज भाजपाचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे दरम्यान त्यांनी सांगितले आहे.

प्रसंगी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रोशन बडोले, सामाजिक कार्यकर्ते शंकर मेंढे, चिखली ग्रामपंचायत चे माजी सरपंच सुधाकर कुर्वे, पत्रकार सुधीर शिवणकर, प्रामुख्याने उपस्थित होते.

येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदारकीची तिकीट काँग्रेस पक्षाकडून बनसोडे यांना मिळणार असल्याची चर्चा जन सामन्यात आहे. अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रात सध्या एस. सी. जागेचे आरक्षण आहे. या जागेवर पुन्हा भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले तर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे उभे होणार आहेत अशी चर्चा आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीट आपल्याला मिळावी अशी अपेक्षा आहे. त्यावरून राजकीय वारे देखील सुरू आहेत. तर अनेकांचा आमदारकीच्या या जागेवर डोळा आहे. अश्यात काँग्रेस पक्षाकडे या जागेसाठी दमदार उमेदवार नव्हता.

पक्ष आपल्या पक्षासाठी दमदार उमेदवार शोधत होता. बनसोडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता काँग्रेस पक्षाची सोध मोहीम थांबली असून बनसोडे यांच्याकडून आता पक्षाच्या अपेक्षा आहेत. असे समजावे लागेल? येणाऱ्या 2024 च्या निवडणुकी मध्ये अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रात जनता कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करनार हे देखील पाहण्यासारखे असेल!


 

Leave a Comment

और पढ़ें