उड्डाण पुलाचे डॉ.बी.आर. आंबेडकर व ग्रामीण रुग्णालयाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामकरण


  • सौंदड येथील ग्राम सभेत ठराव मंजूर, सरपंच हर्ष मोदी यांना गावकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद
  • ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्यासाठी ग्राम सभेत ठराव पारित.

सौंदड : दी. २७ ऑगस्ट : ग्राम पंचायत सौंदड येथे २५ ऑगस्ट रोजी आयोजित ग्राम सभेत सरपंच हर्ष मोदी यांनी अनेक सामाजिक मुद्दे मांडले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : ६ वर नव्याने रेल्वे उड्डाण पुलाचे निर्माण झाले आहे. त्या पुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर नामकरण करणे व सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीआई फुले हे नाव देण्या करीता आयोजित ग्राम सभेत प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला गावातील नागरिकांनी मंजुरी दिली सर्वांच्या मंजुरी मुळे दोन्ही नामकरण पार पडले.

तर संपूर्ण देशभरात ओबीसी जनगणनेचा मुद्दा ओबीसी समाजाने उचलून धरला आहे. याला समर्थन देत ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी सुद्धा या ग्रामसभेत विषय चर्चेला मांडण्यात आला. या सर्व निर्णयांना नागरिकांनी हर्ष मोदी यांना समर्थन दर्शवत भरघोस असा प्रतिसाद देत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री परिणय फुके , माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, भाजप जिल्हा संघटक वीरेंद्र अंजनकर यांच्या माध्यमातून तात्काळ मागणी पूर्ण करण्यासाठी ठरावाची प्रत सुपूर्त करण्यात येईल असे सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


 

Leave a Comment

और पढ़ें