दत्तक घेतलेला गांव मात्र विकासा पासून वंचित… नाव मोठे दर्शन खोटेचा प्रत्यय : आ. सहसराम कोरोटे


  • भाजपाचे माजी आमदार संजय पुराम यांनी दत्तक घेतलेला गांव विकासापासून वंचित.
  • काँग्रेसच्या आमदाराने भाजपाच्या माजी आमदाच्या गावात वाहीली विकासाची गंगा.
  • आ. कोरोटे यांच्या हस्ते 5.58 कोटी रुपयाचे रस्ता विकास कामाचे भूमिपूजन.
  • विविध विकास कामाचे लोकार्पण संपन्न. 

गोंदिया, दि. 24 ऑगस्ट : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील फुटाना हे गाव भाजपाचे माजी आमदार संजय पुराम यांनी दत्तक घेतलेले होते. मात्र या गावात त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास न करता फक्त विकासाचा गाजावाजा करीत नाव मोठे दर्शन खोटेचा प्रत्यय दिला. पुराम यांनी दत्तक घेतलेल्या गावाचा सन 2014 पासून ते 2019 पर्यंत 5 वर्षे लोटून हि या गावाचा विकास केला नाही. त्यामुळे माजी आमदार संजय पुराम यांचेवर फुटाणा गावातील नागरीकांचा रोष आहे.



असे मत त्यांनी मंचावरून वेक्त केले ते देवरी तालुक्यातील ग्राम फुटाणा येथे वृक्षारोपण, सभामंडप, चावडीचे लोकार्पण व 5.58 कोटी रुपयाचे रस्ता विकास कामाचे भूमिपूजन करून उपस्थितांना मंचावरून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी गावातील काही महिलांनी व पुरुषांनी निवेदन देऊन आणखी नव्या सभामंडपाची मागणी केली त्यावर लवकरच कामे मंजूर करू अशी ग्वाही आमदारांनी दिली. त्या पूर्वी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमगाव – देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे हे उपस्थित होते. आयोजकांनी आमदार मोहोदायांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले. तर मंचावरून बोलतांना केंद्र व राज्य सरकारवर ताशेरे वोढले.

यावेळी उपस्थित गोंदिया जिल्हा परिषदेचे गटनेते सदिप भाटिया अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी,  उषाताई शहारे जि. प. सदस्य गोंदिया, राधिकाताई धरमगुडे जी. प. सदस्य गोंदिया, भारतीताई सलामे सदस्या.प. स. देवरी, प्रल्हाद सलामे सदस्या. प. स. देवरी, कमलेश नंदेश्वर सरपंच फुटाणा, नूतन बन्सोड माजी सरपंच फुटाणा, ओमराज बहेकार माजी पं. स. सदस्य, दिपक कोरोटे अध्यक्ष आमगाव विधानसभा युवक कांग्रेस, बळीराम कोटवार, कृष्णा भोयर पो. पा. हळदी, प्रेमनाथ देशमुख पो. पा. फुटाणा, गजानन गहाने तंटामुक्त अध्यक्ष, टेकचंद हिडको माजी सरपंच, मीनाताई देशमुख उपसरपंच, नेतराम बडवाईक गजानन काकडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, तुलाराम कराडे, संदीप मोहबीया आणि ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें