अपंग व गरजू लाभार्थ्यांच्या परिवारावर अन्याय…
- घरकुल यादीतील क्रमवारी लाभार्थ्यांना वगळून दुसर्यां लाभारत्यांना लाभ दील्याचा आरोप! , या मुद्द्याला घेऊन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घेरले.
सडक/अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 23 ऑगस्ट : तालुक्यातील ग्राम शिंदिपार येथे दी. 22 ऑगस्ट रोजी ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्राम सभेचे अध्यक्ष सरपंच उषा मेश्राम, उपसरपंच विशाल पर्वते, ग्राम सेवक योगेश डोंगरे सह अन्य सदस्य उपस्थित होते. तर विरोधीपक्षात असलेले अजित डोंगरवार, अमोल बनसोड, श्यामराव उईके, यांनी घरकुल च्या मुद्द्याला घेऊन विचारणा केली असता ग्राम सभेत सत्ताधारी यांनी कोणतेही उत्तर न देता ग्राम सभा संपली असे जाहीर करून निघून गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या मुळे ग्राम सभेत मोठे गोंदळ झाले. त्या नंतर ग्रामस्थांनी पंचायत समिती गाठली तर बीडिओ उपस्थित नव्हते. त्या नंतर घरकुल विभागाचे अधिकारी वाय. पी. फुले यांना विचारणा केली असता. त्यांनी तांत्रिक कारणामुळे सदर घरकुल यादीत घोळ झाल्याचे सांगितले.
मात्र गावकऱ्यांचे म्हणणे आहे की. ग्राम सभेने ठरवलेल्या प्राधान्य क्रम नुसार लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ देण्यात यावे. मात्र तसे होत नसून प्राधान्य क्रम वगळून दुषऱ्यांनाच लाभ मिळत असल्याचा आरोप केला आहे. सरपंच व उपसरपंच तसेच अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरपंच व उपसरपंच यांच्या जवळीक असलेल्या लोकांना घरकुलाचे लाभ देण्यात आले आहे. असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
या पूर्वी म्हणजे 12, 05, 2022 रोजी च्या पत्रा नुसार गट ग्राम पंचायत शिंदिपार अंतर्गत येत असलेले ग्राम बिर्री, शिंदिपार व मुंडीपार, येथील आठ लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालय येथील बांधकाम विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांनी तुमचे घरकुल मंजूर झाले असून तुम्ही कार्यालय मध्ये कागद पत्र सह फाईल जमा करावी असे संगीतले तर येत्या आठ दिवसांत तुमच्या खात्यावर घरकुलाचा पहिला हप्त जमा करणार असे ही सांगितले तर खर्चा पोटी प्रती लाभार्थी एक हजार रुपये वसूल केले असेही ग्रामस्थांनी सांगितले.
खालील पत्रासह अन्य 4 पुरावे…
या प्रकाराला आज तब्बल 15 महिने झाले. मात्र घरकुलाचा पहिला हप्ता खात्यात जमा न झाल्याने ग्रामस्थांनी ग्राम पंचायत मध्ये विचारणा केली असता त्यावर उपसरपंच विशाल परवते यांनी ग्रामस्थांना सांगितले की तुमची यादी रीशेट झाली असून तुम्हाला सध्या घरकुल मिळणार नाही असे उत्तर दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले.
एकीकडे ग्रामस्थांना घरकुल मंजूर झाले म्हणून पत्र देण्यात येते तर दुसरीकडे तुमचे नाव रीशेट झाल्याचे सांगितले जाते. त्या मुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी बीडीओ यांना रीतसीर पत्र देऊन आमच्या समस्येचे निराकरण न झाल्यास येत्या आठ दिवसात ग्राम पंचायत कार्यालय शिंदिपार ला कुलूप ठोकण्याचा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला आहे. मंजूर घरकुल यादीत 28 लोकांचे नावे आहेत. यातील 4 लोकांचे नावे क्रम नुसार वगळण्यात आले आहेत. त्याची यादी आपण पाहू शकता.
अजित डोंगरवार, ग्रा. पं. सदस्य : घरकुल विभागाचे अधिकारी, सरपंच व उपसरपंच यांच्या संगनमताने घरकुलाच्या क्रम यादीतील नाव वगळून त्यांनी आपल्या जवळीक लोकांना लाभ दिला आहे. एकंदरीत आवश्यक व गरजू लाभारत्यांना मागे टाकले आहे. आम्हाला आठ दिवसात न्याय न मिळाल्यास. ग्राम पंचायत कार्यालयाला सर्व ग्रामस्थ मिळून कुलूप ठोकणार आहोत.
विशाल पर्वते, उपसरपंच : ग्रामस्थांनी केलेले सर्व आरोप तत्यहीन आहेत. कुठलाही घोळ झालेला नाही. गावातील सर्व नागरिक आमचे आहेत. त्या मुळे भेद भावाचे प्रश्नच निर्माण होत नाही.
किशोर बनसोड, उप अभियंता बांधकाम विभाग, पंचायत समिती : क्रम वार नुसार लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ देण्यात येते. काही तांत्रिक कारणामुळे असे प्रकार घडतात. मात्र हा तालुक्यातील पहिलाच प्रकार आहे. ग्राम सभेच्या यादी क्रम नुसार लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ मिळत आहे. यात आता फेर बदल करता येणार नाही.
