सौंदड , दि. 16 ऑगस्ट : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , सौंदड येथे दि. १५ ऑगस्ट २०२३ ला विद्यालयात “स्वातंत्र्य दिनाचा” सोहळा संपल्यानंतर जगदीश लोहिया, संस्थापक – अध्यक्ष, लोहिया शिक्षण – संस्था, सौंदड यांच्या अध्यक्षतेखाली पालक – शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. न. घाटबांधे, उपाध्यक्ष, लो. शि. संस्था, अनिल मेश्राम, से. नि. प्राचार्य, लता गहाणे, सरपंच फुटाळा, बिरला गणवीर पत्रकार, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर .एन. अग्रवाल उपस्थित होते .
सभेचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक-अध्यक्ष, लोहिया शिक्षण-संस्था, सौंदड यांनी शिक्षक व पालकांच्या समस्या विषयी तसेच शाळेत वर्ग ५ ते १० करीता सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी लता गहाणे, सरपंच फुटाळा, पालक बिरला गणवीर, पुरुषोत्तम भिवगडे यांनी विद्यालयातील शिस्त व मिळणाऱ्या शिक्षणाविषयी प्रशंसनीय वक्तव्य व्यक्त केले.
विद्यालयातील शिक्षक डी. एस. टेंभुरने, डी. ए. दरवडे, टी. बी. सातकर, के. के. कापगते, जी. एस. कावळे, एस. पी. मांडारकर यांनी पालक – शिक्षक सभेचे महत्व तसेच जात/ नाव/आडनाव/जन्म तारीख बदलांबाबत, विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड बाबत, शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांबाबत, NMMS – शिष्यवृत्ती परीक्षा बाबत, एलिमेंटरी व इंटरमिडिएट चित्रकला परीक्षेबाबत, नवोदय विद्यालय परीक्षेबाबत, १० वी व १२ वी च्या मंडळाच्या परीक्षाविषयक धोरणांविषयी, कास्ट व्हॅलीडिटीविषयी, विद्यालातील विविध – उपक्रम, योजना, सुविधा याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या सर्व कार्यकारिणीचे, पालक – शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य गण, पालक तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
