सौंदड पॅराडाईज इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी/सौंदड, दि. 16 ऑगस्ट : गीताई बहुउद्देशीय विकास शिक्षण संस्था सौंदड द्वारा संचालित पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथे सकाळी आठ वाजता माजी ग्रामपंचायत सदस्या गिताबाई राऊत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला।

याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉक्टर मार्गाये, संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊत माजी सरपंच लालचंद खडके, केवलचंद शहारे, जीवतू मेश्राम, भरत वर्मा, मंगेश तरोने, प्रणय ठेंगरे, गणेश गहाणे, राजेश लंजे, सह अन्य प्रतिष्ठित गावकरी यांचे उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे संचालन विजय कोचे यांनी केले. देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना प्रथम श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांची भाषणे देशभक्तीपर डान्स घेण्यात आले तसेच प्री प्रायमरी चे विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सर्वांचे लक्ष वेधून टाकले।

शेवटच्या टप्प्यामध्ये प्रमुख पाहुण्यांचे भाषण घेण्यात आले। कवी केवलचंं शहारे व डॉक्टर मार्गाये यांनी आपल्या स्वलिखित कविता सादर केल्या । संस्थेचे संचालक संतोष राऊत यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून स्वातंत्र्यासाठी किती कष्ट भोगावे लागले हे महत्त्व पटवून दिले ।

मुख्याध्यापिका राजश्री राऊत मॅडम यांनी स्वातंत्र्याबद्दल आपले दोन शब्द व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रीती राजस यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्राची श्रीवास्तव, आम्रपाली राऊत, उषा बिसेन, ज्योती नेवारे, रंगारी मॅडम, परिचर कल्पना खेकरे,  लिहीनता मडावी, लोकेश राऊत, योगराज मस्के , उमेश कवरे आणि रामटेके ड्रायव्हर यांचे सहकार्य लाभले ।


 

Leave a Comment

और पढ़ें