सरकारच्या निष्काळजी पणामुळे आम्हाला… कर्मचारी मिळाले नाही : आमदार सहशराम कोरोटे


देवरी, दी. 15 ऑगस्ट : ग्राम पालांदुर येथे ( पीएससी ) आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे दोन महिन्यात लोकार्पण आपण करणार आहोत. तर ग्राम गोरे या ठिकाणी गेली दोन वर्षे पासून आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. तेथील काही साहित्य देखील चोरीला गेले आहे. आमदार सहशराम कोरोटे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की सरकारच्या निष्काळजी पणामुळे त्या ठिकाणी आत्ता पर्यंत आम्हाला कर्मचारी मिळाले नाही.



ते देवरी तालुक्यातील ग्राम चिचगड येथे आज 15 ऑगस्ट रोजी आरोग्य वर्धिनी उपकेंद्र चिचगड च्या इमारतीचे लोकार्पण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या हस्ते आज लोकार्पण संपन्न झाले. प्रसंगी उपस्थित राधिका धरमगुडे जि. प. सदस्या, अंबिका बंजार सभापती पं. स. देवरी, रंजित कासम पं. स. सदस्य, भाग्यश्रीताई भोयर सरपंच चिचगड, अर्चना नरवरे माजी सरपंच चिचगड, सी. के. बिसेन, जसवंता भारद्वज सरपंच पिपरखारी, रेवन्ता अत्तरगडे सरपंच वांढरा, पुष्पा राऊत सरपंच भागी, बळीराम कोटवार, भुवन नरवरे, द्वारकाप्रसाद धरमगुडे, गीता भोयर ग्रा. पं. सदस्या, निशा परिहार ग्रा. पं. सदस्या, जगदीश नरवरे पो. पाटिल, सुदाम भोयर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले त्या मुळे गोरे येथील आणि पालांदुर येथील आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोहळा आपण संपन्न करू शकलो नाही. या पूर्वी मी डीएचओ बरोबर बोललो आहे. ते म्हणाले की लवकरच कर्मचारी उपलब्ध करून देतोय त्या नंतर दोन्ही आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोहळा आपण संपन्न करू असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रामुख्याने गावकरी उपस्थित होते. तर आमदारांनी स्वतः आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. या इमारती मुळे जनतेची आरोग्य सेवा होणार असे ही मत त्यांनी मंचावरून वेक्त केले.


 

Leave a Comment

और पढ़ें