सडक अर्जुनी, दिं. 11 ऑगस्ट : “पोलीस दादालोरा खिड़की योजनेअंतर्गत” आय. टी. आय कॉलेज, सडक/अर्जुनी येथे गोंदिया जिल्हा पोलिस दल व BSA कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्या समन्वयाने ITI / डिप्लोमा व पदवीधर अनुभवी युवक / युवती यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने पुणे येथील नामांकित 08 कंपन्यांच्या विविध 550 पदांच्या भर्तिसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 09 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये पो. ठाणे डूग्गीपार परिसरातील साधारण 140 ते 160 मुला / मुलींनी सहभाग घेतला होता. त्यात 27 मुला / मुलींना नियुक्तीपत्र देण्यात आले व 14 मुला / मुलींना Short-Listed करण्यात आले. जेणेकरुन त्यांना नंतर जॉइनिंग कॉल किवा लेटर देण्यात येणार असल्याचे सुनील अहिरे सर BSA कम्पनी प्रतिनिधि यांनी सांगितले.
सदरचा रोजगार मेळावा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर व उपविभागीय पोलीस अधीकारी संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनात घेण्यात आला असून सदर मेळाव्या करीता पोनि. श्री. रेवचंद सिंगनजुडे, ठाणेदार डुग्गीपार तसेच पोलिस स्टेशन डुग्गीपार चे सर्व पो. स्टाप. यांनी मोलाची भूमिका बजावली.