लोहिया विद्यालयात पालक – शिक्षक सभेचे आयोजन


सौंदड, दि. ११ ऑगस्ट : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथे दि. १० ऑगस्ट २०२३ ला विद्यालयाचे प्राचार्य मा. एम. एन. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली. ” माझी माती माझा देश” उपक्रमाअंतर्गत पालक – शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले.

त्यात सदर संकल्पनेविषयी पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्याच बरोबर “हर घर तिरंगा ” या उपक्रमाची सुद्धा माहिती देण्यात आली. तसेच १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने पर्यवेक्षक डी. एस. टेंभुरने, स. शि. सौ. कल्पना काळे, शा. शि. कु .यू. आर. बाच्छल, प्राध्यापक आर . एन. अग्रवाल तसेच विद्यालयातील इतर शिक्षक उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें