लोहिया विद्यालयातील “ध्रुव अनिल कापगते” याची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड


सौंदड, दि. ११ ऑगस्ट : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथील वर्ग ९ चा ध्रुव अनिल कापगते या विद्यार्थ्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय म रा.पुणे , जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या द्वारा दि. ८ व ९ ऑगस्ट २०२३ ला गोंदिया येथे जिल्हास्तरीय फ्री स्टाईल १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आणि त्याची चंद्रपूर येथील विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. ध्रुव च्या या यशाबद्दल जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष , लो. शि. संस्था, पंकज लोहिया, सदस्य लो. शि. संस्था , प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी .एस. तेंभुरणे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व विभागीय स्तराच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें