“गोल्ड सिनेमा हॉल” येथे “दहशतवादी हल्ला” मॉक ड्रिलचे आयोजन.


गोंदिया, दि. 11 ऑगस्ट :  देशाअंतर्गत आणि राज्यात अतिरेकी कारवायांच्या घटना घडत असताना जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था, शांतता राखण्यासाठी सर्वत्र ‘मॉक ड्रील’ चे आयोजन करून राबवण्यात येते. एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी अशा मोहिमांमधून घेण्यात येते.

यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे. यात काय काय उणिवा राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि पुढील काळात त्या होणार नाहीत. याची दक्षता घेण्यात येते. जनतेची सुरक्षितता सर्वतोपरी लक्षात घेऊन त्यादृष्टीने ही प्रात्यक्षिके घेण्यात येतात, कोणत्याही दहशतवादी, आतंकवादी, नक्षलवादी, हल्याप्रंसगी प्रसंगावधान राखुन करावयाच्या कार्यपद्धती संबधाने मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात येते.

या अनुषंगाने गोल्ड सिनेमा, गोविंदपुर रोड गोंदिया येथे पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया अशोक बनकर, यांचे आदेशान्वये, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया सुनील ताजने, यांचे मार्गदर्शनाखाली व नेतृत्त्वात गोंदिया जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदार तर्फे दिनांक – 10 ऑगस्ट रोजी दहशतवादी हल्ला मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते.

“दहशतवादी हल्ला मॉक ड्रिल” ची रंगीत तालीम राबवित असताना 3 सशस्त्र दहशतवाद्यांनी गोल्ड सिनेमा गोविंदपूर गोंदिया येथे सिनेमा पाहण्यास आलेल्या दर्शकांमध्ये दहशत पसरविण्याचे उद्देश्याने गोल्ड सिनेमा बॉक्स रूम मधील स्टाफला वेठीस धरले आहे. अशी माहीती सिनेमा हॉल सुरक्षा यंत्रणे कडून जिल्हा पोलीस प्रशासनास मिळताच गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन यंत्रणा तातडीने घटनास्थळ गोल्ड सिनेमा येथे पोहचुन दर्शाकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना म्हणून सिनेमा पाहण्यास आलेल्या दर्शकांची कोणतीही जिवीत आणि वित्तहानी न होवु देता सिनेमा हॉलमध्ये बॉक्स ऑफिस रुममधील स्टाफला वेठीस धरणाऱ्या तिन्ही सशस्त्र दहशत वाद्यांना जिल्हा पोलीस प्रशासनद्वारे जेरबंद करून ताब्यात घेण्यात आले. सिनेमा हॉलमधील दर्शक जखमींना तात्काळ ॲम्बुलन्सद्वारे दवाखान्यात पाठविण्यात आले. व वेठीस धरलेल्या बॉक्स ऑफिस रूममधील स्टाफला पुर्वव्रत मोकळे करण्यात आले.

सदर दहशतवादी हल्ला मॉक ड्रिल मध्ये बि.डी.डी.एस, आणि श्वान पथकाव्दारे संपुर्ण गोल्ड सिनेमा परिसराची स्फोटक पदार्थ ठेवल्याची शक्यता असल्याने संपूर्ण परिसरची तपासणी करण्यात आली. फॉरेन्सीक लॅब मार्फतीने घटनास्थळाचे भौतीक दुवे तपासण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही सशस्त्र दहशतवाद्याना स्थानिक पोलीसांचे स्वाधिन करून ताब्यात देण्यात आले. त्यानंतर ट्राफिक पोलीस अंमलदारां च्या मदतीने सिनेमा हॉल परिसरातील गर्दी सुरळीत करण्यात आली. आणि गोल्ड सिनेमा परिसरात झालेला गोंधळ मेगाफोन व्दारे सुचना देवुन नियंत्रणात आणण्यात आला.

“दहशतवादी हल्ला मॉक ड्रील” ची रंगीत तालीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील दहशतवाद विरोधी पथक, बिडीडीएस पथक, पोलीस मुख्यालय, येथील पोलीस पथक, पो. ठाणे रामनगर, गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण येथील पोलीस पथक, अंगुलीमुद्रा विभाग, वैदयकीय स्टाफ, अग्नि शामक दल व जलद कृती दल (क्यु.आर. टी), दंगल नियंत्रण आरसीपी पथक ), बिनतारी संदेश विभाग, मोटर परिवहन विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा सुरक्षा शाखा, जिल्हा विशेष शाखा, नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी अंमलदार इत्यादींनी सहभाग नोंदविला. त्याच प्रमाणे गोल्ड सिनेमा चे मालक अग्रवाल यांनी दहशतवादी हल्ला मॉक ड्रील राबविण्या- करीता विशेष सहाय्य केले.

रंगीत तालीम दरम्यान कोणासही कोणत्याही प्रकारची ईजा अथवा हानी झालेली नाही. सदरची रंगीत तालीम ही आज दिनांक – 10 ऑगस्ट रोजी चे सायंकाळ 16. 45 वाजता पासून ते 18.00 वाजे पर्यंत घेण्यात आली.

भविष्यात दहशतवादी आतंकवादी, नक्षलवादी अश्या दहशतवादी संघटनेकडून अतिरेकी कारवाया अथवा हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे, तसेच नागरीकांनी प्रसंगावधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे याबाबत सदरचे रंगीत तालीमव्दारे दर्शविण्यात आले. तसेच भविष्यात नागरीकांनी जागरुक राहुन दहशतवादी अतिरेकी, आतंकवादी, नक्षलवाद, संबधी काहीही माहीती , सूचना प्राप्त झाल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष, गोंदिया फोन क्र. 07182 -236100, आणि डायल 112 वर संपर्क करुन कळवावे असे आवाहन जिल्ह्यातील जनतेस गोंदिया जिल्हा पोलीस दलांच्या वतीने करण्यात येत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें