गोंदिया, दि. 11 ऑगस्ट : जिल्ह्यातील गोरेगाव-कोहमारा महामार्गावरील मुर्दोली जंगल परिसरात कारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जखमी झाला होता. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वायरल झाले आहे. हा व्हिडिओ 10 ऑगस्ट च्या रात्रीचा असल्याचे सांगितले जात आहे. जखमी अवस्थेत असलेल्या वाघाला वन विभागाने रेस्किव करीत. उपचाराकरिता नागपूर ला हलवले मात्र वाटेतच वाघाचा मृत्यू झाला.
सदर नर वाघ हा नागझिरा जंगलातील T – 14 वाघिणीचा 2 वर्षाचा बछडा होता. असे वृतातून समोर येत आहे. सकाळ पासून त्याला रेस्क्यू करण्याचे अभियान सुरू होते. दरम्यान वाघाला जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर वाघाला नागपूर ला नेतांनी वाटेतच त्या वाघाचा मृत्यू झाला. वाघ गंभीर जखमी झाल्याने तो हालचाल करू शकत नव्हता, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पुढील कारवाई नागपूर गोरेवाडा येथे आज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
