आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन


अर्जुनी/मोरगाव, दि. 11 ऑगस्ट : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते आमदार विकास निधी अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत बोदरा येथील देऊळगाव येथे 7 लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन आज 11 आगस्ट रोजी करण्यात आले.

तत्पूर्वी ग्रामपंचायत देऊळगाव येथे नागरिकांना संबोधित करतांना आमदार म्हणाले, की या मंजूर कामांसह आपल्या गावातील उर्वरित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या माझ्या मानस आहे. गावातील मूलभूत सुविधा व इतर कामे प्रलंबित न राहू देता लवकर मार्गी लावेल.

याप्रसंगी किरणताई धवळे सरपंच ग्रामपंचायत बोदरा, येमूबाई बनकर उपसरपंच, घनश्याम झोडे सदस्य, मंगेश कवरे ग्रा.प. सदस्य, रोजगार सेवक भास्कर कवरे, सुशीला दिवटे ग्रा.प. सदस्य, प्रमोद डोंगरे , रत्नाकर टेंभुर्णे, राजकुमार भैसारे, सुनिल बनकर, जयप्रकाश राऊत, विष्णु खोटेले, पुरुषोत्तम कोहले, माणिक जांभुळकर, सौरभ झोडे, श्रीराम जांभुळकर, आत्माराम दिवटे, रामचंद्र डोंगरवार, हितेश बडोले, हरीजी हेडाऊ प्रामुख्याने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें