गोंदिया, दि. 09 ऑगस्ट : शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे 9 आगष्ट रोजी क्रांती दिवस निमित्त स्वातंत्र संग्रामातील सर्व हुतात्म्यांना वंदन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. तसेच जागतिक आदिवासी दिना निमित्त लोकनायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून सर्व आदिवासी समाज बांधवांना आदिवासी दिनाच्या माजी आमदार राजेंद्र जैन व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, अशोक सहारे, विनीत सहारे, भगत ठकराणी, अरुण काला, संजय काला, खालिद पठाण, दीपक कनोजे, राजू एन जैन, राजू येडे, चंद्रकुमार बहेकार, एकनाथ वहिले, शैलेश वासनिक, रफीक खान, हरबक्ष गुरनानी, मयूर जडेजा, शरभ मिश्रा, हेमराज डहाके, सुनील पटले, लखन बहेलिया, रौनक ठाकूर, वामन गेडाम, नरेंद्र बेलगे सहीत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
