सौंदड, दि. 10 ऑगस्ट : 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन तसेच आदिवासी दिन शासनाच्या,”मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केलेत. शिक्षकांनी विषयावर प्रकाश टाकलेत.
संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया संस्थापक यांनी क्रांती दिन व आदिवासी दिनानिमित्त “मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत बीरसा मुंडा यांच्या जीवनावर व ‘हर घर तिरंगा’ ‘घर घर तिरंगा’ याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले.
लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट,२०२३ ला विद्यालयात जागतिक आदिवासी दिवस, क्रांती दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगत सोहळा निमित्तच “माझी माती माझा देश” कार्यक्रम लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. लोहिया यांचे अध्यक्षतेखाली साजरे करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्ने प्राध्यापक आर. एन. अग्रवाल उपस्थित होते. या निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया , संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था सौंदड तसेच प्रमुख अतिथी यांनी आदिवासींचे दैवत, स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले.
यावेळी सर्व उपस्थितांनी पंचप्रण प्रतिज्ञा घेतली.”हर घर तिरंगा ” उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांनी तसेच विद्यालयातील शिक्षकांनी आदिवासी समाजातील महापुरुषांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगाविषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच शिक्षकांनी आदिवाशी समाजातील विद्यार्थांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी विद्यार्थांना माहिती दिली व सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी सुद्धा गीत व भाषणाद्वारे जागतिक आदिवासी दिवस, क्रांती दिन व माझी माती माझा देश याविषयीचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आर. आर. मोहतुरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक के. के. कापगते यांनी मानले.
