गोंदिया जिल्हात दुसऱ्या टप्प्यात ३५ राईस मिल तीन वर्षा करिता काळ्या यादीत!


  • पूर्वी देवरी तालुक्यातील ७ राईस मिल काळ्या यादीत टाकण्यात आले होते. ही केंद्रीय पथकाची कार्यवाही होती…
  • तांदूळ नगरीत तांदळाचा काळा बाजार?

गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दि. 09 ऑगस्ट : तांदूळ नगरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्यात पुन्हा दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्यातील ३५ राईस मिलर्स ला तीन वर्षा करिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अशी माहिती स्वतः जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. तर या आधी देखील देवरी तालुक्यातील सात राईस मिलर्सला तीन वर्षा करिता काळ्या यादीत टाकण्यात आले होते.



विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्यात तांदूळ जमा करताना येथील तांदूळ गुणवत्ता अधिकारी तांदळाची गुणवत्ता तपासून तांदूळ गोदामात जमा करतात तर दुरीकडे जमा केलेला तांदूळ दुसऱ्या जिल्यात गेल्यावर केंद्रीय पथकाच्या तपासणीत हाच तांदूळ मानवी खाण्यास अयोग्य असल्याचे तपासात उघड झाल्याने गोंदिया जिल्यातील जिल्हा पुरवठा अधिकरी आणि तांदूळ गुणवत्ता अधिकऱ्यांच्या कार्यप्रणीवर प्रशन चिन्ह निर्माण होत आहे.

गोंदिया जिल्हा मार्केटींग फेडरेशन तसेच आदिवाशी विकास महामंळाने गोंदिया जिल्यात खरेदी केलेल्या शासकीय धान्याची भरडाई करण्यासाठी गोंदिया जिल्या सह इतर जिल्यातील राईस मिलर्स सोबत धान्य भरडाई चा करार केला जातो.

मात्र येथील काही… राईस मिलर्स ला देण्यात आलेल्या धान्याची राईस मिलर्स भरडाई न करता इतर राज्यात धानाला जास्त भाव मिळत असल्याने धान्याची विक्री करून उत्तर प्रदेश राज्यातील तांदूळ विकत घेत गोंदिया जिल्यात सीएमआर च्या नावावर अधिकाऱ्यांच्या संगनमताने तो तांदूळ जमा करतात.

तर दुसरीकडे हाच तांदूळ स्वतः धान्य दुकानात ग्राहकांना देण्यासाठी बाहेर जिल्यात पाठविला जातो. तर स्वतः धान्य दुकानात देण्यात येणाऱ्या तांदूळ हा मानवी खाण्यास योग्य आहे कि नाही याची जवाबदारी एफ सी आय च्या केंद्रीय पथकाची असल्याने केंद्रीय पथक जिल्यातील स्वतः धान्य दुकानांना पुरविण्यात येणाऱ्या किंवा राईस मिलर्स कडून जमा करण्यात येणाऱ्या तांदूळ गोदामात जाऊन पाहणी करीत जमा करण्यात आलेल्या तांदळाची गुंवता तपासत असून गोंदिया जिल्यातील जवळपास ३५ राईस मिलर्स ने राज्यातील इतर जिल्यात पाठविलेल्या तांदळाची तपासणी केली असता ३५ राईस मिल मालकाने मानवी खाण्यास योग्य नसलेला तांदूळ जमा केल्याने गोंदिया जिल्यातील ३५ राईस मिलर्सला तीन वर्षा करिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

या आधी देखील गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्यातील
1) वसंत राईस मिल डोगरगाव, 2) तिरुपती राईस मिल देवरी,
3) महाराष्ट्र एग्रो इंडस्ट्री चिचगड, 4) मा सदी अग्रो इंडस्ट्री देवरी, 5) इंडियन फूड प्रॉडक्ट चिचगड, 6) बालाजी राईस मिल बोरगाव बाजार तसेच 7) माँ भगवती राईस इंडस्ट्री देवरी या सात राईस मिलर्स ला तीन वर्षा करिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

  • वर्ष 2022 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील 35 राईस मिल काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

1) गांजानंद राईस मिल गोंदिया, 2) प्रल्हाद राईस मिल गोंदिया, 3) प्रेम राईस मिल गोंदिया,
4) मीरा राईस मिल गोंदिया,
5) राधाकृष्ण राईस मिल गोंदिया, 6) श्याम धणी राईस मिल गोंदिया,
7) सुभलक्षमी राईस मिल गोंदिया,
8) सद्गुरू राईस मिल गोंदिया, 9) साई बाबा राईस मिल गोंदिया, 10) आशुतोष फूड गनखेरा गोरेगाव,
11) सहकार राईस मिल गोरेगाव, 12 ) तिरुपती राईस मिल गोरेगाव,
13) राहुल एग्रो गोरेगाव,
14) गुरुकृपा प्याडी प्रोसेस डव्वा, 15) दादीमाँ राईस मिल गणखेरा, 16) श्री सिद्धिविनायक राईस मिल तेढा गोरेगाव,
17) स्वस्तिक राईस मिल गणखेरा,
18) दादीमाँ राईड गणखेरा,
19) माँ गायत्री एग्रो डव्वा,
20) गौरव राईस मिल परसोडी, 21) गजानंद राईस मिल इटखेडा,
22) श्री साई श्रद्धा राईस मिल कोरंभीटोला,
23) शिवम राईस मिल बोरी, 24) रामदेव एग्रो अर्जुनी मोरगाव,
25) संजय राईस मिल अर्जुनी मोरगाव,
26) श्री ईश्वर राईस मिल महागाव,
27 शारदा राईस मिल अर्जुनी मोरगाव,
28) रामदेव बाबा राईस मिल अर्जुनी मोरगाव,
29) बालाजी राईस मिल नवेगावबांध,
30) श्री गणेश राईस मिल सावरी,
31 सहयोग राईस मिल पांढराबोडी,
32) अन्नपूर्णा एग्रो खतिया,
33) न्यू शक्ती राईस मिल दतोरा, 34) चिंतामणी राईस मिल गोंदिया,
35) गजानद एग्रो कटगी,
36) धर्मा राईस मिल बटांना, 37) श्री दादीजी इंडस्ट्री सवारी, 38) आशुतोष फूड गणखेरा, 39) जय दुर्गा राईस मिल गोरेगाव,
40) श्री दादीजी एग्रो गणखेरा असे नावे आहेत.

या यादीत 40 नावे असली तरी काही राईस मिलर्स धारकांचे डब्बल प्लांट आहेत. त्या मुळे यादीतील नावे वाढली आहेत. एकंदरीत 35 राईस मिलर्सला तीन वर्षा करिता काळ्या यादीत टाकण्यात आले. असून पुढील तीन वर्षे या राईस मिलर्सला शाशकीय धान्याची भरडाई करता येणार नाही. त्यामुळे गोंदिया जिल्यात चालले काय असा प्रशन सर्व सामान्य लोकांना पडला आहे. तांदूळ नगरीत तांदळाचा कळा बाजार सुरू असल्याचे हे जिवंत पुरावे आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें