…मोदी हे राहुल गांधींना घाबरतात हे दिसून येते : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले


मुंबई, वृत्तसेवा, दि. 07 ऑगस्ट : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचनाही लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी राहुल गांधी संसद परिसरात दाखल झाले. यावेळी काँग्रसच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल केल्यानंतर देशातील अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज 07 ऑगस्ट रोजी सामना या वृत्त पत्राने ऑनलाईन वर दिलेल्या माहितनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. हा देशासाठी आनंदाचा क्षण असून तानाशाही प्रवृत्तीविरोधात हा राहुल गांधींचा विजय आहे, असे नाना पटोले म्हणाले.

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांची दोन वर्षांची शिक्षा रद्द केली. त्यामुळे त्यांचा संसदेच्या पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. राहुल गांधींना खासदारकी बहाल झाल्यामुळे राहुल गांधींना उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. राहुल गांधी सोमवारी संसद परिसरात दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. याबाबत नाना पटोले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी राहुल गांधींना घाबरतात. राहुल गांधी यांची खासदारकी 5 मिनिटांत रद्द करण्यात आली. मात्र खासदारकी रद्दची ऑर्डर पूर्ण वाचून पुन्हा ती बहाल करायला 48 तास लावले. यावरून मोदी हे राहुल गांधींना घाबरतात हे दिसून येते, असे पटोले म्हणाले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जनतेच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. संपूर्ण देशाला या गोष्टीचा आनंद झाला आहे, असेही पटोले म्हणाले.


 

Leave a Comment

और पढ़ें