- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना १०३ व्या जयंतीस्पर अभिवादन..!
गोंदिया, दिनांक : ०२ ऑगस्ट : तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत दांडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पैकाटोला येथे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था एकोडी ता. गोंदिया च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्याच्या शिक्षणात मदत व्हावी म्हणून त्यांना शैक्षणिक साहित्य जसे की, नोटबुक, पेंसिल, कटर व खोळ रबर आदी साहित्याचे वाटप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर रविकांत ( गुड्डू ) बोपचे, राकपा विधानसभा प्रमुख तिरोडा – गोरेगाव विधानसभा, प्रकाश पटले माजी पंचायत समिति सदस्य, पंकज अंबूले सरपंच दांडेगाव, माजी सरपंच रविकुमार ( बंटी ) पटले, पुष्पा नेवारे उपसरपंच दांडेगाव, बेनिराम गावडे माजी ग्राम पंचायत सदस्य, रंजित टेंभरे सामाजिक कार्यकर्ता, रगुविर उईके, नामदेव मेश्राम सर्पमित्र, विनोद कोपरकर, यु. एम. शहारे आंगनबाड़ी सेविका, मंगला भोंडे शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष, कृष्णकुमार केवट उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिति, मोनू पठाण, प्रशांत मिश्रा, सी. एम. गेडाम मुख्याध्यापिका व जे. डी. उके सहायक शिक्षक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
मान्यवरांनी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करतांनी सांगितले की अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे यांना एकूण तीन आपत्य होती, मधुकर, शांता आणि शकुंतला असे त्यांचे नाव. साठे यांचे शालेय शिक्षण झालेले नाही. याचे कारण म्हणजे, सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी अवघ्या दीड दिवसामध्येच शाळेत जाणे सोडून दिले होते. मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईमध्ये अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी, त्यांचे मूळ नाव “तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे” असे आहे.
कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. आपल्या लोककलेच्या माध्यमातून समाजातील जातीयवाद, आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरिबांच्या व कष्टकरांच्या तळहातावर तरलेली आहे. असे अण्णाभाऊ म्हणायचे आणि हे त्यांचे विचार सत्य आहेत. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यांसारख्या आंदोलनांमध्ये त्यांनी आपले सहकार्य दाखवले.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यांसारख्या आंदोलनांमध्ये त्यांनी आपले सहकार्य दाखवले. अण्णाभाऊ साठे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता. ते त्यांना आपले गुरू मानायचे. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था एनजीओ एकोडीचे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, उपाध्यक्ष आरिफ़ पठाण, सचिव टेकसिंह पुसाम, सहसचिव फुलवंता ठाकरे, सदस्य दिलिप देशमुख, पोर्णिमा तायवाडे व बाला बिरणवार यांनी प्रयत्न केले.