गोंदिया, दिनांक : ०२ ऑगस्ट : गंगाझरी पोलिस स्टेशन च्या हद्दीतील टिकायतपुर किंडगीपार गावातील रामेश्वर बिसेन याचे घरासमोरील गोठ्यात बाधलेल्या 07 लहान मोठ्या बकऱ्या व टिकायतपुर येथील अनमोल लिल्हारे यांचे घराजवळील गोठ्यातुन 09 लहान मोठ्या बकर्या अशा 16 नग बकर्यांची चोरी 12 जुलै 2023 रोजी रात्रीला करण्यात आली होती. बकर्यांची अंदाजे किमत 68 हजार रुपये होती. तक्रारी वरून पो. ठाणे गंगाझरी येथे 1) अप क्र. 234/2023 कलम 380, 461 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसेच दिनांक 13 जुलै रोजी पो. ठाणे. दवनिवाडा हद्दीतील तक्रारदार विजय उईके रा. सालाईटोला यांच्या घरासमोरील गोठ्यातुन 04 बकऱ्या अंदाजे किमत 16 हजार रुपये असे असून. अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने तक्रारी वरून पो. ठाणे दवनिवाडा येथे 1) अप क्र. 184/2023 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दिनांक 07 जुलै रोजी पो. ठाणे आमगाव हद्दीतील माणेगाव ठाणा येथे तक्रारदार लोकचंद मरसकोल्हे रा. मानेगाव ठाणा यांचे टीनाच्या शेडचे कुलूप तोडुन शेड मधील 12 नग बकऱ्या किमती 71 हजार रुपये, अज्ञात चोराने चोरुन नेल्याने तक्रारी वरून पो. ठाणे आमगाव येथे – 1) अप क्र. 222/ 2023 कलम 380,461 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुप्त बातमीदार कडून माहिती प्राप्त झाली की, काही दिवसापूर्वी डेरेवाले राहत होते. त्यांनीच बकरी चोरी केली असावी असा संशय व्यक्त करून ते मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील राहणारे होते. अशी माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेतल असता दिनांक 22 जुलै 2023 रोजी संशयित ईसंम नामे -1) युनुस ऊर्फ साबीन आर्यन खान वय 22 वर्षे, रा. ठी. बडेगाव, मरारटोला, तहसील/पो. ठा. देवेन्द्र नगर, जि. पन्ना राज्य मध्य प्रदेश सध्या रा. गोरतारा, सोहगपुर, जिल्हा शेहडोल, राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेण्यात आले.
त्यास बकऱ्या चोरीच्या संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी त्याचे साथीदार फरार आरोपी नामे – 1) गोलू ऊर्फ अमिर मुबारक हुसैन वय 35 वर्ष, 2 ) जावेद मुबारक हुसेन वय 35 वर्ष, 3) राजा शफीक शेख वय 22 वर्ष तिघे रा. बापूनगर, ओडीया मोहल्ला, खुर्षीपार, दुर्ग, छ. गं. यांचे सोबत मिळून बकऱ्या चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार सदर संबंधात अधिकचा तपास करत फरार अरोपीतांचे शोधकार्य करीता पथक रवाना होवून आरोपीतांचा शोध घेण्यात आला फरार तीन्ही आरोपी यांना खुर्षीपार, दुर्ग, छत्तीसगड येथून ताब्यात घेवून गुन्ह्या संबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी वरील तिन्ही गुन्हयाची कबुली दिली त्याचप्रमाणे भंडारा जिल्हयातील लाखनी, साकोली येथे सुध्दा बकऱ्या चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल करून विक्री केल्याचे तसेच पैसे आपसात वाटून घेतल्याचे सांगीतले.
आरोपी नामे- 1 ते 4 यांचे ताब्यातून बकऱ्या चोरीच्या गुन्ह्यातील त्यांना बकऱ्या विक्रीतील प्राप्त रूपये मुद्देमाल – 1) नगदी 39 हजार 500 रूपये. 2) एक इको चारचाकी गाडी क्रं. CG – 07 BZ- 5242 किंमत अंदाजे 3 लाख 50,000 रूपये असा एकूण 3 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आला.
आरोपी नामे – क्रं. 1) युनुस ऊर्फ साबीन आर्यन खान वय 22 वर्षे, रा. ठी. बडेगाव, मरारटोला, तहसील/पो. ठा. देवेन्द्र नगर, जि. पन्ना राज्य मध्य प्रदेश यास दिनांक 22/07/2023 रोजी पो. ठाणे गंगाझरी अप. क्र. 234 /2023 कलम 380, 461, भादवि गुन्ह्यात ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. तसेच फरार आरोपी क्रं. 2 ते 4 नामे – 2) गोलू ऊर्फ अमिर मुबारक हुसैन वय 35 वर्ष, 3 ) जावेद मुबारक हुसैन वय 35 वर्ष, 4) राजा शफीक शेख वय 22 वर्ष रा. बापूनगर, ओडीया मोहल्ला, खुर्शीपार, दुर्ग, छत्तीसगड यांना दिनांक 01/08/ 2023 रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.
वरील नमूद सर्व आरोपी हे आंतरराज्य बकऱ्या चोरी करणारी टोळी असून यांनी अश्याच प्रकारे आणखी गुन्हे केल्याची शक्यता आहे. वरील नमूद प्रमाणे 1 ते 4 आंतरराज्यिय टोळी तील आरोपीतांना पुढील कार्यवाही होणेस्तव पो. ठाणे गंगाझरी दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्यांचा अधिकचा तपास गंगाझरी पोलीस करीत आहेत.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी निखील पिंगळे पोलीस अधिक्षक, अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गु. शा. चे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा पथकातील स. पो. नि. विजय शिंदे, पो. उप. नि. महेश विघ्ने, पो. हवा. तुलसीदास लुटे, दिक्षित दमाहे, धनंजय शेंडे, पो. शि. संतोष केदार, अजय रहांगडाले,चापोशि विनोद गौतम, कुंभलवार यांनी केलेली आहे.