संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करा, माळी महासंघाचे निवेदन


सडक अर्जुनी, दिनांक : ०२ ऑगस्ट : संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा अशा  आशयाचे लेखी निवेदन माळी महासंघ गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सडक अर्जुनी येथील तहसीलदार काळे व डूग्गीपार येथील पोलिस निरीक्षक यांना आज ०२ ऑगस्ट रोजी देण्यात आले. सदर निवेदनात म्हंटले आहे की – आम्ही क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचे अनुयायी लेखी तक्रार देतो की, अमरावती येथे दिनांक २७/७/२०२३ रोजी जय भारत मंगल कार्यालय येथे संभाजी भिडे यांनी सभा बोलावली होती.

त्यामध्ये त्यांनी अर्वाच्ये भाषेत देशातील थोर पुरुषांच्या बाबतीत अशोभनीय असे वक्तव्य केले. त्यामुळे या महापुरुषांचे चरित्र हनन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच संभाजी भिडे हे वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करुन या देशातील थोर पुरुषांचा अपमान करित असतात. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांनी केलेले वक्तव्य हे समाज माध्यमात अतिशय तिव्रतेने प्रसारित झालेले आहे. तरी आम्ही आपणास निवेदन देत आहोत की, संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी. तसेच त्यांच्या सभेवर बंदी घालण्यात यावी.

निवेदन देतेवेळी गोंदिया जिल्हा अध्यक्ष प्रशांत नगरकर, किशोर मदनकर महा सचिव, मंजु डोंगरवार विदर्भ उपाध्यक्ष, ज्योती इरले जिल्हा सचिव, वर्षा शाहारे प.स. सदस्य, मंजू इरले, चरणदाश शाहारे त.मू.स. अध्यक्ष सौन्दड, वंदना खडके, सुरेश डोंगरवार, सचिन हटकर, उमेश बनकर, धनराज लोथे आदी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें