लोहिया विद्यालयात लोकमान्य टिळक व जमुनादेवी लोहिया यांची पुण्यतिथी साजरी


सौंदड, दिनांक : ०२ ऑगस्ट : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुणादेवी लोहिया प्राथमिक शाळा,सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट २०२३ ला विद्यालयात लोकमान्य टिळक व जमुनादेवी लोहिया पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोहिया शिक्षण संस्था सौंदडचे संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया, प्रमुख अतिथी म्हणून लोहिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, आ.न. घाटबांधे, संस्था सदस्य पंकज लोहिया, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. तेंभुरणे प्राध्यापक आर. एन. अग्रवाल उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था सौंदड, विद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थांनी लोकमान्य टिळक व जमुनादेवी लोहिया यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमात दोन मिनिटांचे मौन ठेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या विविध कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यगन, विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कू. यू. बी. डोये यांनी केले तर आभार पर्यवेक्षक डी. एस. तेंभुरणे यांनी मानले.


 

Leave a Comment

और पढ़ें