खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने; गोंदिया रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट


  • सौंदर्यीकरणासह सोयी सुविधांच्या कामांना मंजुरी
  • गोंदिया रेल्वे स्थानकाला अमृत भारत योजनेत समावेश

गोंदिया, दिनांक : ०२ : केंद्र शासनाच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन या योजनेत नागपूर – हावडा या मुख्य लोह मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात यावा त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण, रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, पाथवे, अत्याधुनीक वातानुकुलीन सह अनेक महत्वाचे कामे करण्यात यावी, असा पाठपुरावा खा प्रफुल पटेल यांनी रेल्वे मंत्रालयासह केद्र सरकारशी केले. दरम्यान गोंदिया रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला असून खा. प्रफुल पटेल यांनी सुचविलेल्या 30. 96 रु. कोटी च्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे गोदिया रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. यासाठी खासदार प्रफुल पटेल यांनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले.

गोंदिया जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी खा. प्रफुल पटेल सतत प्रयत्नरत राहतात. सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद व कार्यकर्ते तसेच पुढाऱ्यांच्या माध्यमातुन समोर येणाऱ्या जिल्हयातील समस्या मार्गी लावण्याचे कामही खा. प्रफुल पटेल प्राधान्याने करतात. या श्रृखलेत गोंदिया रेल्वे स्थानकातील समस्या, विकास कामे आणि गोंदिया रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश करण्यात यावा याबाबद खा. प्रफुल पटेल यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालय तसेच भारत सरकारशी पाठपुरावा केला. खा. प्रफुल पटेल यांच्या सतत च्या पाठपुराव्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाला अमृत भारत योजनेत समावेश केले आहे.

या योजने अर्तगत गोंदिया रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा अनुषगांने खा. प्रफुल पटेल यांनी सुचविलेल्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. या योजने अर्तगत रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण, पाथवे, सौदर्यीकरण, रंग रंगोटी, वाहन पार्कीग ची सोईस्कर व्यवस्था रेल्वे स्थानका अर्तगत पादचारी रस्ता, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हील चेअर व आधुनिक वाहन, आरक्षण गृह, सी.सी टि वी, कोच डिस्ले बोर्ड, हायमास्ट लाईट, आधुनीक स्वंयचलीत पायऱ्या, लिप्ट यासह अनेक कामे करण्यात येणार आहे. यासाठी 30.96 कोटी चा निधी ही मंजुर करण्यात आला आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झाल्याने रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवेचा लाभ मिळणार आहे. खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने जिल्हयातील जनतेने त्यांचे आभार मानले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें